IND Vs ENG : 'वर्तनाकडे लक्ष द्यावे..', 'या' माजी दिग्गज कर्णधाराने नव्या कसोटी कर्णधार Shubhman Gill ला भरला दम! विधानाने गोंधळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
IND Vs ENG : अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवडण्यात आले. भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलवर कसोटी संघाची जबाबदारी सोपवली आहे. उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतला पसंती देण्यात आली आहे. गिल कर्णधार झाल्याबद्दल माजी दिग्गजांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झालीय आहे. आता त्यात माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांची भर पडली आहे. त्यांनी शुभमन गिलच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. गावस्कर यांनी गिलबाबत एक इशारा देखील दिला आहे. ज्या विषयी आता चर्चा सुरू झाली आहे. गावस्कर यांनी गिलबद्दल स्पोर्ट्स तकवर एक विधान केले आहे. गावस्कर म्हणाले की, ‘गिलला आता कर्णधारपदाची जबाबदारी म्हणून त्याच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे अळंगणारा आहे.’
हेही वाचा : PBKS vs MI : IPL प्लेऑफच्या टॉप दोनमध्ये कोण बाजी मारणार? आज मुंबई इंडियन्ससमोर पंजाबचे आव्हान..
सुनील गावस्कर म्हणाले, “भारताचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या खेळाडूवर नेहमीच दबाव असतो, कारण संघाचा सदस्य असणे आणि कर्णधार असणे यामध्ये प्रचंड फरक असतो, कारण जेव्हा तुम्ही संघाचा एक सदस्य असता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या खेळाडूंसोबत संवाद साधत असतात, परंतु जेव्हा तुम्ही कर्णधार होतात तेव्हा तुम्हचे वागणे असे असावे लागते की, संघातील इतर खेळाडू तुमचा आदर करतील. कर्णधाराचे वर्तन त्याच्या कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरत असते.’
गिल कर्णधार झाल्यानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “गिल आज कर्णधार झाला आहे पण याचे संपूर्ण श्रेय त्याच्या वडिलांना आणि युवराज सिंगला द्यावे लागेल, युवीने गिलवर खूप मेहनत घेतली आहे असून त्याचे फळ त्याला आज मिळाले आहे.’ अशी भावना योगराज सिंग यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या..
एएनआयशी बोलत असताना योगराज सिंह म्हणाले की, गिलच्या कारकिर्दीला घडवण्याबाबत चांगले मार्गदर्शन आणि कौटुंबिक पाठिंब्याचा प्रभाव असल्याचे नमूद केले. तसेच ते म्हणले की, ‘शुभमन गिलच्या कामगिरीचे श्रेय हे त्याचे वडील आणि युवराज सिंग यांना जाते. जर शुभमन गिल आज कर्णधार झाला आहे, तो बराच काळ तसाच राहिला तर युवराज सिंगचे मार्गदर्शन यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.’
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज निवृत्त झालयानंतर कर्णधार म्हणून भारतीय कसोटी संघाची जबाबदारी गिलवर आली आहे. पुढील महिन्यात, भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी मालिका २० जून रोजी होईल.