फोटो सौजन्य - KolkataKnightRiders
Chennai Super Kings vs Kolkata Night Toss Update : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे. या सामन्यात एम एस धोनी आणि अजिंक्य रहाणे आमने-सामने असणार आहेत. या सामन्याचे नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा जखमी झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करताना पुढील स्पर्धेत दिसणार आहे. त्यामुळे संघामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. महेंद्रसिंग धोनी याला कर्णधाराचे पद पुन्हा मिळाल्यामुळे दोन्हीचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.
चेन्नई सुपर किंगच्या संघाने या स्पर्धेमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही. चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवले होते त्यानंतर त्यांना सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या संघाला बंगळुरू, राजस्थान, गुजरात आणि पंजाब या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण कोलकत्ता नाईट रायडर्स आत्तापर्यंत पाच सामने झाले आहेत त्यामध्ये त्यांना तीन सामन्यात पराभव झाला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे.
🚨 Toss 🚨@KKRiders won the toss and elected to bowl against @ChennaiIPL in Chennai.
Updates ▶ https://t.co/gPLIYGimQn#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/r2GTOQ6cvc
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये राहुल त्रिपाठी आणि अंशुल कम्बोज यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. तर कोलकाता नाईट राइडर्सने एक बदल केला आहे यामध्ये मोईन अलीला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. चेन्नईच्या संघाने मागील सामना घरच्या मैदानावर गमावला होता त्यामुळे आजच्या सामन्यात विजयच्या उद्देशाने मैदानात उतरतील.
रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आर अश्विन, नूर अहमद, अंशुल कम्बोज, खलील अहमद.
क्विंटन डी क्वाक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली, हर्षित राणा, वरुण चक्रवती