फोटो सौजन्य - Chennai Super Kings/Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Preview : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन आयपीएलच्या इतिहासात मजबूत संघ आहेत, जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने एकही ट्रॉफी जिंकली नसली तरी या दोन संघांमध्ये शत्रुत्व हे भारत-पाकिस्तानच्या शत्रुत्वापेक्षा कमी नाही. आजचा सामना चेन्नईचा बालेकिल्लाचे चेपॉकमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आजचा मार्ग हा सोपा नसणार आहे. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चे पाकच्या खेळपट्टीवर बंगळुरूच्या संघाने फक्त एकदा चेन्नईच्या संघाला पराभूत केले आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो चेपॉक मैदानावर विजयासाठी १७ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न आज बंगळुरूचा संघ करेल. आरसीबीनेचे चेपॉक मैदानावर चेन्नईला फक्त एकदाच पराभूत केले आहे तेही २००८ मध्ये स्पर्धेच्या पहिल्या सीजनमध्ये. तेव्हा या सीझनमध्ये सध्याचा आरसीबी संघातील स्टार फलंदाज विराट कोहली या संघाचा भाग होता आणि तो यावेळी पुन्हा १७ वर्षाच्या दुष्काळ संपवण्याच्या इराद्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ मैदानात आज उतरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणारा सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर चेपॉकची खेळपट्टी ही फिरकीपटूंना अनुकूल असणार आहे. त्याचबरोबर घरच्या मैदानावर विरोधी संघांना कडक टक्कर देण्यासाठी चेन्नईच्या संघ आज सज्ज झाला आहे. चेन्नईच्या संघामध्ये अनुभवाची कमी नाही हे कोणापासून लपले नाही. त्याचबरोबर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यामध्ये झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विन त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीच्या मास्टर प्लानने संघाला पहिला विजय मिळवून दिलाच. पण आज रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद यांसारखे फिरकीपटूनसमोर आरसीबीचे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये या तिघांनी दमदार कामगिरी केली होती.
फिरकी गोलंदाजीचा सामना करणे हा नेहमीच कोहलीचा फलंदाजीचा बलस्थान राहिला नाही, परंतु गेल्या दोन वर्षांत त्याने या विभागात बरीच सुधारणा दाखवली आहे. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे फिरकीपटूंविरुद्ध अधिक स्वीप आणि स्लॉग स्वीप खेळण्याची त्याची इच्छा आणि शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात कोहलीला त्याची सर्व कौशल्ये दाखवावी लागतील. कोहलीला फिल साल्ट, कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा यांसारख्या फलंदाजांचीही साथ लागेल.
FAN FRIDAY IT IS! 💛🥳
Start. The. Whistles! 🥳💪🏻🔥#CSKvRCB #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/lmy0BBm3KN— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2025
दुसरीकडे, चेन्नईला आशा असेल की मधल्या फळीला पुन्हा फॉर्ममध्ये येईल कारण शिवम दुबे, दीपक हुडा आणि सॅम करन हे गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले होते. त्याला रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याकडून अधिक पाठिंबा लागेल आणि महेंद्रसिंग धोनीकडून आणखी एका प्रभावी खेळीची अपेक्षा असेल. चेन्नई सुपर किंग्ज मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळू न शकलेली आघाडीची वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवणार आहे. जर श्रीलंकेचा खेळाडू वेळेवर तंदुरुस्त झाला तर त्याला नॅथन एलिसच्या जागी संधी मिळू शकते.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जपनीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.