फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Rajasthan Royals first innings report : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 183 धावांचे लक्ष उभे केले आहे. राजस्थान रॉयल्स आयपीएल मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहेत तर चेन्नई सुपर किंग्सला दुसरा विजय हवा आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे या सामन्यांमध्ये चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यामध्ये फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वाल आणखी एकदा तिसऱ्या सामन्यात फेल ठरला त्याने तीन चेंडू खेळून फक्त चार धावा केल्या तर संजू सॅमसनने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. नितीश राणाने संघासाठी दमदारखेळी खेळली त्याने ३६ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने संघासाठी २८ जानेवारी ३७ धावा केल्या.
Innings Break!
Powered by Nitish Rana’s blistering knock, #RR set a target 🎯 of 1️⃣8️⃣3️⃣#CSK aim to chase this successfully for the coveted 2 points
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/fGtgMaWze7
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
मागील सामन्यांमध्ये ध्रुव जुरेलने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती पण या सामन्यात चेंडू चार खेळून तीन धावा करून बाद झाला. तर वानिंदू हसरंगा पुन्हा एकदा फेल ठरला तर शिमरॉन हेटमायरने १६ चेंडूंमध्ये चेंडूंमध्ये १९ धावा केल्या त्याचबरोबर कुमार कार्तिकेया, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे हे खेळाडू दुहेरी आकडा पार करण्यात अपयशी ठरले.
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्स फिरकी गोलंदाज नूर अहमदने आणखी एकदा कौतुकस्पद कामगिरी केली आहे. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध दोन विकेट्स घेतले आहेत तर मथीशा पाथिराणाने संघासाठी दोन विकेट्स घेतले त्याचबरोबर खलील अहमदने देखील दोन विकेटची कमाई केली. रवींद्र जडेजा आणि रविचंद्र अश्विनी संघासाठी प्रत्येकी एक विकेट घेतला.
मागील सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर राजस्थान सलग दुसऱ्या पराभवानंतर शेवटचा सामना घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळत आहे, आज दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा टिकून आहेत, कोणता संघ विजयी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य आहे.