फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Delhi Capitals defeated Sunrisers Hyderabad by 7 wickets : आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या सुपर संडेमध्ये पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यांमध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये दिल्ली कॅपिटलच्या संघाने अक्षर पटेलच्या नेतृत्वात आयपीएल २०२५ चा दुसरा विजय नावावर केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत गेले होते तर दुसरा सामन्यात सनरायझर्स हैदराबादला आजच्या सामन्यात पराभूत केले आहे. दिल्ली कॅपिटलच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला सात विकेट्सने पराभूत केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाचा अनुभवी फलंदाज मिचेल स्टार्कने संघासाठी ३.४ ओव्हरमध्ये ३५ धावा देत पाच विकेट्स नावावर केले तर मोहित शर्माने संघासाठी एक विकेट घेतला त्याचबरोबर कुलदीप यादवने ४ ओव्हरमध्ये २२ धावा देत तीन विकेट्स संघाला मिळवून दिले.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. यामध्ये संघाने त्यांच्या पावर प्लेच्या सहा ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावले होते. यामध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितेश कुमार रेड्डी, त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड यांसारखे दमदार फलंदाज दिल्ली कॅपिटलच्या गोलंदाजांसमोर फेल ठरले. अभिषेक शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात फेल ठरला त्याने एक चेंडू खेळला आणि एक धाव करून धावबाद झाला. ईशान किशनने पहिल्या सामन्यात राजस्थान विरुद्ध शतक झळकावले होते पण तो दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
A Delightful Win 🎊@DelhiCapitals continue their winning run in #TATAIPL 2025 with an all round performance against #SRH 🙌
Scorecard ▶️ https://t.co/L4vEDKzthJ#DCvSRH pic.twitter.com/4rpc60cT9j
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
या सामन्यांमध्ये त्याने दोन धावा केल्या आणि त्यानंतर मीचेल स्टार्कने संघाला विकेट मिळवून दिली. नितेश कुमार रेडी आणखी एकदा फेल ठरला आणि त्याने एकही न करता बाद झाला. सनरायझर्स हैदराबादच्या फक्त एकच फलंदाजाने अर्धशतक झळकावले. हैदराबादचा २३ वर्षे युवा खेळाडू अनिकेत वर्माने ४१ मध्ये ७४ धावा केल्या पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. काही वेळासाठी अनिकेत वर्माची साथ दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर हेनरिक क्लासेनने संघासाठी १९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झाले तर जॅक फ्रॉसर म्चाग्रुक याने संघासाठी ३२ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या तर फापदुप्लेसीने २७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आणि अर्धशतक ठोकले केल राहुलने १५ धावा करून बाद झाला.