Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Davis cup : टेनिसमध्ये भारताच्या हाती पुन्हा निराशा; कोरियाने रचला नवा इतिसाह

Davis cup : डेव्हिस चषकाच्या अंतिम-८ मध्ये प्रवेश मिळवण्याचे भारताचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकले नाही. कोरियाच्या संघाने भारतावर ३-१ असा विजय मिळवला. नव्या फॉर्मेटमध्ये नॉकआउटमध्ये जागा मिळवणारा कोरिया आशियातील पहिला संघ ठरला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 19, 2026 | 04:15 PM
Davis cup : टेनिसमध्ये भारताच्या हाती पुन्हा निराशा; कोरियाने रचला नवा इतिसाह

Davis cup : टेनिसमध्ये भारताच्या हाती पुन्हा निराशा; कोरियाने रचला नवा इतिसाह

Follow Us
Follow Us:
  • कोरियाचा भारतावर ३-१ असा विजय
  • अंतिम-८मध्ये जागा मिळवण्याची संधी हुकली
  • नव्या फॉर्मेटमधील नॉकआउट खेळणारा कोरिया आशियातील पहिला संघ
 

टेनिसमधील डेव्हिस चषका (Davis cup) च्या नव्या फॉर्मेटमध्ये इतिहास रचण्याची भारताची संधी थोडक्यात हुकली. अंतिम-८ मध्ये जागा मिळवणारा पहिला आशियाई देश बनण्याचे भारताचे स्वप्न कोरियन संघाने पूर्ण होऊ दिले नाही. शनिवारी सियोलमध्ये खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर राउंड-२ च्या सामन्यात कोरियाने भारताचा ३-१ असा पराभव केला.

या वर्षाच्या सुरुवातीला नेदरलंडला पराभूत केल्यानंतर भारताकडे इतिहास रचण्याची संधी होती, पण सुरुवातीच्या दोन्ही एकेरी सामन्यात पराभव मिळाल्याने कठिण परिस्थिती निर्माण झाली होती. दुहेरी सामन्यात शानदार कामगिरी करत भारताने काही काळ सामन्यात पुनरागमन केले होते, पण कोरियाने चौथ्या सामन्यात विजय प्राप्त करत सामना आपल्या नावे केला.

सुरेश-बालाजीच्या जोडीची कमाल

दक्षिणेश्वर सुरेश आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीने कोरियन जोडीचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव करत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. दुसरा सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन केले. त्यांनी अतितटीच्या निर्णायक सेटमध्ये संयम राखला व महत्त्वपूर्ण ब्रेक प्राप्त केले, ज्यामुळे ते सामन्यात सर्व्हिस करण्याच्या स्थितीत आले. त्यानंतर भारताला सामना जिंकण्यासाठी इतर दोन एकेरी सामन्यात विजय मिळवायचा होता. त्यामुळे सुमित नागल काही काळ दबावात आल्याचे दिसले.

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

कोरियाचे दमदार पुनरागमन

या काळात कोरियाच्या सुनवू क्वोनने एकेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी करत सुमित नागलला गेममध्ये चांगली कामगिरी करण्याची कोणतीच संधी दिली नाही. क्वोनने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला व पहिला सेट ६-१ असा आपल्या नावे केला. नागलने दुसरा सेट आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला, पण कोरियाच्या टेनिसपटूने त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. अखेरीस त्याने हा सेट ६-२ असा जिंकत कोरियाला डेव्हिस चषकाच्या नॉकआउट फेरीत पोहचवण्याचा मान मिळवला.

या पराभवासह भारताच्या डेव्हिस चषकातील शानदार मोहिमेचा शेवट झाला. भारत नव्या फॉर्मेटमध्ये अंतिम-८ मध्ये पहिल्यांदा जागा मिळवणारा आशियाई देश बनला असता. कोरियाने या विजयासह आशियाई टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. कोरिया आता स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत जागा मिळवणारा पहिला आशियाई देश ठरला आहे.

आता भारत २०२७ साली क्वालिफायर राउंड-१ मध्ये खेळेल. सियोलमध्ये झालेल्या या सामन्यासह रोहित राजपाल यांच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळाचा शेवट होऊ शकतो, कारण त्यांचा सध्याचा कॉन्ट्रॅक्ट हा डिसेंबर २०२६ पर्यंतचा असून अद्याप तो वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली नाही.

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

Web Title: Davis cup india vs koria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • International Tennis Tournament
  • sumit nagal
  • Tennis

संबंधित बातम्या

चार सेट्सचा थरार अन् Alexander zverev चा विजय! बेन शेल्टनला नमवत पहिल्यांदाच पटकावला US Open 2026 चा ताज
1

चार सेट्सचा थरार अन् Alexander zverev चा विजय! बेन शेल्टनला नमवत पहिल्यांदाच पटकावला US Open 2026 चा ताज

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे
2

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.