भारतामधील टेनिसचा स्टार खेळाडू सुमित नागलने इतिहास रचला आहे. काल ८ एप्रिल रोजी सुमित नागलने रोलेक्स मॉन्टे कार्लो मास्टर्सची दुसरी फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत सुमितने जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर असलेल्या एर्नाल्डी कोचा ५-७, ६-२, ६-४ असा दोन तास ३७ मिनिटांत पराभव केला. या विजयासह सुनीत नागलने या चॅलेंजमध्ये तिसरा विजय भारताच्या नावावर केला आहे. पुढील फेरीत नागलचा सामना सध्याचा उपविजेता डेन्मार्कच्या होल्गर रुनेशी होईल.
? Congratulations to Sumit Nagal for becoming the first ever Indian male to win on clay at the ATP Masters in the singles main draw. @nagalsumit ? pic.twitter.com/E826dLFPCz
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) April 9, 2024
नागलने रचला इतिहास
सुमित नागल हा पहिला भारतीय खेळाडू अशी जो ४२ वर्षानंतर रोलेक्स मॉन्टे कार्लो मास्टर्सच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचला आहे. याआधी भारताचे १९८२ मध्ये रमेश कृष्णनने एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. मॉन्टे-कार्लो मास्टर्स ही पुरुष व्यावसायिक खेळाडूंसाठी एक टेनिस स्पर्धा आहे, जी फ्रान्समधील रोकब्रुन-कॅप-मार्टिन येथे आयोजित केली जाते. हे मॉन्टे कार्लो कंट्री क्लबमध्ये क्ले कोर्टवर खेळले जाते आणि एप्रिलमध्ये होते. दरवर्षी त्याचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा एटीपी टूरवरील नऊ एटीपी टूर मास्टर्स 1000 इव्हेंटचा भाग आहे.