Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग

World Tennis League : वर्ल्ड टेनिस लीगचा पाचवा हंगाम 17 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान बेंगळुरूमध्ये रंगणार आहे. पॉला बडोसा, युक भांबरीसह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 12, 2026 | 08:54 PM
World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग

Follow Us
Follow Us:
  • मान्यताप्राप्त स्पर्धेत आंतरराष्ट्रीय टेनिसपटू खेळणार
  • चाहत्यांना अविस्मरणीय सामने पाहण्यास मिळतील
  • युकी भांबरी, सुमित नागलही खेळणार
 

World Tennis League : आंतरराष्ट्रीय टेनिसमधील दिग्गज खेळाडू आणि भारतातील अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. वर्ल्ड टेनिस लीगच्या पाचव्या हंगामाचे आयोजन 17 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान बेंगळुरूमध्ये करण्यात येणार आहे. केएसएलटीए येथील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

मान्यताप्राप्त स्पर्धेत आंतरराष्ट्रीय टेनिसपटू खेळणार

आयकॉनिक स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या मान्यता प्राप्त आयोजित होणाऱ्या या लीगमध्ये आघाडीचे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि भारतातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार आहेत. मागील चार हंगामांतील यशानंतर पाचव्या पर्वातही जागतिक दर्जाच्या टेनिसचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

मागील हंगामात सहभागी झालेले पॉला बडोसा, युक भांबरी, सुमित नागल, दक्षिणेश्वर सुरेश, माया राजेश्वरन रेवती आणि श्रीवल्ली भामिदिपती यांसारखे खेळाडू आगामी हंगामातही कोर्टवर उतरणार आहेत. त्यामुळे स्पर्धेबाबतची उत्सुकता वाढली आहे. पाचव्या हंगामातील खेळाडू आणि संघांची संपूर्ण यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?

चाहत्यांना अविस्मरणीय सामने पाहण्यास मिळतील

वर्ल्ड टेनिस लीगचे सह-संस्थापक महेश भूपती म्हणाले, मागील हंगामात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंच्या प्रभावी सहभागामुळे अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले. चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्पर्धेभोवती निर्माण झालेली ऊर्जा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पाचव्या हंगामात हीच गती कायम ठेवत लीग अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

लीगच्या सह-संस्थापिका हेमाली शर्मा म्हणाल्या, वर्ल्ड टेनिस लीग पुन्हा बेंगळुरूमध्ये आणताना आनंद होत आहे. या शहराला समृद्ध क्रीडा संस्कृती आणि टेनिसप्रेमी प्रेक्षकांचा मोठा वर्ग लाभला आहे. भारतातील प्रस्थापित आणि उदयोन्मुख खेळाडूंसह जागतिक दर्जाच्या टेनिसपटूंचा सहभाग यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य असेल.

Mumbai City FC : आय-लीगचा गोलमशीन आता मुंबई सिटीच्या ताफ्यात; लुका माजसेनशी करार

2022 मध्ये दुबई येथे स्थापन झालेली वर्ल्ड टेनिस लीग ही मिश्र-लिंग सांघिक टेनिस स्पर्धा आहे. भारताचे माजी टेनिसपटू महेश भूपती यांनी या लीगची सह-स्थापना केली आहे. चार संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि दुहेरी तसेच मिश्र दुहेरीचे सामने खेळवले जातात. राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक गेममधील विजय संघाच्या गुणतालिकेत महत्त्वाचा ठरतो.

नोव्हाक जोकोविच, इगा स्वियातेक, डॅनिल मेदवेदेव आणि आर्यना सबालेंका यांसारख्या आंतरराष्ट्रीय टेनिसमधील नामवंत खेळाडूंनी यापूर्वी या लीगमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे पाचव्या हंगामात कोणते आंतरराष्ट्रीय स्टार सहभागी होणार, याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगचा पाचवा हंगाम कधी होणार आहे?

    Ans: ही स्पर्धा 17 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान होणार आहे.

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?

    Ans: बेंगळुरूमधील केएसएलटीए येथील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर स्पर्धा खेळवली जाईल.

  • Que: वर्ल्ड टेनिस लीगमध्ये कोणते भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: सुमित नागल, युक भांबरी, दक्षिणेश्वर सुरेश, माया राजेश्वरन रेवती आणि श्रीवल्ली भामिदिपती यांसारखे खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: World tennis league season 5 bengaluru december 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Dubai
  • sumit nagal
  • Tennis Premier League

संबंधित बातम्या

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
1

Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल

Burj Khalifa : भुसभुशीत वाळूवर कशी उभी राहिली 828 मीटरची भव्य गगनचुंबी इमारत? वाचा बुर्ज खलिफाची थरारक कथा
2

Burj Khalifa : भुसभुशीत वाळूवर कशी उभी राहिली 828 मीटरची भव्य गगनचुंबी इमारत? वाचा बुर्ज खलिफाची थरारक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.