Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs GG, WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा! अंतिम सामन्यात जेमिमा आणि स्मृती आमनेसामने

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा ७ विकेट्सने पराभव करून चौथ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 04, 2026 | 09:16 AM
DC vs GG, WPL 2026: Delhi Capitals thrashed Gujarat by 7 runs! Jemimah and Smriti will face each other in the final match.

DC vs GG, WPL 2026: Delhi Capitals thrashed Gujarat by 7 runs! Jemimah and Smriti will face each other in the final match.

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Capitals have reached the final : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात  दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह, दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत  धडक मारली. एलिमिनेटरमध्ये, गुजरात जायंट्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावून १६८ धावा उभ्या केल्या. एलिमिनेटरमध्ये गुजरातकडून बेथ मूनीने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने लिझेल आणि शफालीसह दमदार सुरुवात दिली. त्यानंतर जेमिमाने कर्णधारपदाला साजेसा असा डाव खेळला. दिल्लीने २६ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात घातला. दिल्लीने १५.४ षटकांत ३ विकेट्स गमावून १६९ धावा पूर्ण केल्या आणि अंतिम संन्याचे टिकीट पक्के केले.

हेही वाचा :IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

प्रत्युत्तरादाखल, शफाली वर्मा आणि लिझेल ली या दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८९ धावांची सलामी रचली. लिझेलने २४ चेंडूत ४३ धावा आणि शेफालीने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज २३ चेंडूत ४१ धावा करून माघारी गेली. लॉरा वोल्फार्ट २४ चेंडूत ३२ धावा करून नाबाद तर कॅप ३ धावा करून नाबाद राहून दिल्लीचा विजय निश्चित केला. गुजरातकडून वेअरहॅमने दोन बळी टिपले. राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली.

And then there were 2⃣ 🙌 Cannot wait for the 2026 #TATAWPL Final @RCBTweets 🆚 @DelhiCapitals ❤️💙#ClaimTheCrown | #RCBvDC | #Final pic.twitter.com/LpsHd585Xh — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 3, 2026

तथापि, गुजरात जायंट्सला दुसऱ्या षटकातच सोफीच्या (६ धावा) रूपात पहिला धक्का बसला. अनुष्का शर्माने १३ चेंडूत १६ धावा केल्या. कर्णधार अ‍ॅशले गार्डनरला भोपळा देखील फोडता आला नाही. कनिका आहुजाने ६ धावा केल्या, वेअरहॅमने २५ चेंडूत ३५ धावा केल्या. जायंट्सकडून सलामीवीर बेथ मुनीने ५१ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर जॉर्जिया वेअरहॅमने २५ चेंडूत ३५ धावा केल्या आणि काशवी गौतमने १० चेंडूत १८ धावांची जलद खेळी साकारली. कॅपिटल्सकडून शेनेल हेन्रीने तीन विकेट्स तर नंदिनी शर्माने दोन विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये आरसीबीसोबत दोन हात करणार आहे.

हेही वाचा : WPL मध्ये खेळणार CSK ची टीम? महिला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याबाबत CEO कासी विश्वनाथन यांनी केला मोठा खुलासा

गुजरात जायंट्स महिला प्लेइंग इलेव्हन: बेथ मुनी (डब्ल्यू), सोफी डेव्हाईन, अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर (क), जॉर्जिया वेरेहम, भारती फुलमाली, कनिका आहुजा, काशवी गौतम, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड

दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सी), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा

Web Title: Dc vs gg wpl 2026 delhi capitals defeated gujarat by 7 wickets to reach the final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Ashleigh Gardner
  • WPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.