फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Toss update for Delhi Capitals vs Mumbai Indians match : या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या झालेल्या सामन्यांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आज सुपर संडेचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा आयपीएल २०२५ चा २९ वा सामना आहे, या सामन्याचे आयोजन दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्याचे नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यत चार सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी चारही सामन्यांमध्ये विजय मिळवून ८ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांमध्ये रनरेट +१.२७८ इतका आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने या सीझनमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेमध्ये २ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त १ सामन्यात विजय मिळाला आहे आणि ४ सामान्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to bowl against @mipaltan in Delhi.
Updates ▶ https://t.co/sp4ar866UD#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/i7RqDJaMSB
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (विकेटकिपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, विप्राज निगम, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट जसप्रीत बुमराह.