Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC च्या पराभवाचा ‘खलनायक’ कोण? अक्षर पटेलने कोणावर फोडले खापर? केले ‘हे’ मोठे विधान

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 142 रन्स केल्या. अखेर केकेआरने फीन एलनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 05:18 PM
DC च्या पराभवाचा ‘खलनायक’ कोण? अक्षर पटेलने कोणावर फोडले खापर? केले ‘हे’ मोठे विधान
Follow Us
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफचे स्वप्न झाले कठीण 
केकेआरकडून 8 विकेट्सने दारुण पराभव 
दिल्लीने खेळले तब्बल 51 डॉट बॉल

Axar Patel On Delhi Capitals Team: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2026 मध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र मधले काही सामने त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर परत काही सामने जिंकल्यावर सलग दोन सामने पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा दारुण पराभव केला आहे. त्यावर आता कर्णधार अक्षर पटेलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 142 रन्स केल्या. अखेर केकेआरने फीन एलनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहे. काल दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी 51 डॉट बॉल खेळले. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.

KKR Vs DC Live: फीन एलनची तुफानी खेळी; दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

काय म्हणाला कर्णधार अक्षर पटेल?

काल महत्वाच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आहे. अक्षर पटेलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर बोलताना अक्षरने केवळ फलंदाजांच्या बेजबाबदारपणावरच बोट ठेवले नाही, तर फिरकी गोलंदाजांच्या चुकाही जाहीरपणे बोलून दाखवल्या. या सामन्यात आम्ही मोठी धावसंख्या करू शकलो नाही, खेळपट्टीवर रन बनवण्यात आम्ही मागे राहिलो. आमच्या गोलंदाजीत काही चुका झाल्या, त्या आम्हाला महागात पडल्या.

दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव

दिल्लीच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने पथूम निसांकाच्या अर्धशतकी खेळीवर 142 रन्सपर्यंत मजल मारली. अखेर या सामन्यात केकेआरचा विजय झाला आहे. केकेआरने दिल्लीवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.

KKR Vs DC Live: फीन एलनची तुफानी खेळी; दिल्लीचा 8 विकेट्सने पराभव, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दिल्लीकडून केएल राहूल आणि पथूम निसांका यांनी डावाची सुरुवात केली. मात्र केएल राहूल 14 बॉलमध्ये 23 रन्स करून आउट झाला. त्यानंतर चांगला फॉर्म असलेला नितीश राणा खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला. दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके मारणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांना 142 रन्सच करता आल्या. मात्र पथूम निसांका सोडून दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक असणार आहे. 

Web Title: Delhi capitlas captain axar patel statement about loss against kkr tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Delhi Capitals
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
1

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
2

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.