Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjaya De Silva Resigns: धनंजय डी सिल्वाच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वात खळबळ; काय आहे कारण?

Dhananjaya De Silva Stepped Down as Sri Lanka Test Captain: श्रीलंकेचा कसोटी कर्णधार धनंजय डी सिल्वाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो खेळाडू म्हणून खेळणे सुरू ठेवणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 03:00 PM
Dhananjaya De Silva Resigns

Dhananjaya De Silva Resigns

Follow Us
Follow Us:
  • धनंजय डिसिल्वाने दिला धक्का
  • सोडली श्रीलंकेची टेस्ट कॅप्टन्सी
  • २०२४ मध्ये मिळाली होती मोठी जबाबदारी
Dhananjaya De Silva: श्रीलंकेचा कसोटी कर्णधार, धनंजय डी सिल्वाने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. डी सिल्वाची जानेवारी २०२४ मध्ये संघात नियुक्ती झाली होती. आता, त्याने ही जबाबदारी सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. धनंजयने श्रीलंका क्रिकेट निवड समितीला पत्र लिहून कर्णधारपद सोडण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या मते, ही जबाबदारी आता एका नवीन खेळाडूला दिली पाहिजे. (Dhananjaya De Silva stepped down as Sri Lanka Test captain)

IPL 2027 पूर्वी पंजाब किंग्समध्ये मोठी खळबळ! ‘या’ दोन दिग्गजांनी सोडली साथ; पाँटिंगसमोर मोठं आव्हान

धनंजय डी सिल्वाचा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला पत्र

श्रीलंकेचा कसोटी कर्णधार धनंजय डी सिल्वाने गुरुवारी कर्णधारपदाची सूत्रे पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आल्याचे सांगत तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. ३५ वर्षीय धनंजयने पत्र पाठवून निवड समितीला आपला निर्णय कळवला आहे. तो खेळाडू म्हणून निवडीसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, असे वृत्त आहे की श्रीलंका क्रिकेटच्या सीईओने हा निर्णय स्वीकारला असून धनंजयला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डी सिल्वाच्या कर्णधारपदाखाली श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने १८ सामने खेळले आणि त्यापैकी सात सामने जिंकले. या काळात त्याची फलंदाजीची कामगिरीही प्रभावी होती. धनंजयने जानेवारी २०२४ मध्ये दिमुथ करुणारत्नेकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर, धनंजय डी सिल्वाने श्रीलंकेचे १८ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. श्रीलंकेने यापैकी सात सामने जिंकले. कर्णधार म्हणून धनंजयने १,१३० धावा केल्या आणि नऊ विकेट्स घेतले.

डी सिल्वाची आतापर्यंतची कारकीर्द

दरम्यान, धनंजय डी सिल्वाने श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळले आहेत. त्याने २०१५ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, त्याची कारकीर्द जवळपास ११ वर्षे चालली. डी सिल्वाने श्रीलंकेसाठी ६९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने १३ शतके आणि २० अर्धशतकांसह ४,४३१ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने ९३ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने १० अर्धशतकांसह १,९२४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ४८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात तीन अर्धशतकांसह ८९० धावा केल्या आहेत.

नवीन कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही

दमथ करुणारत्नेनंतर धनंजय डी सिल्वाला कर्णधारपद देण्यात आले. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने अद्याप नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. श्रीलंकेचा संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरेल. ही मालिका खूप महत्त्वाची असेल. वृत्तानुसार, कुसल मेंडिसला संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

Web Title: Dhananjaya de silva resigns sri lanka test captain new captain pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Kusal Mendis
  • Sri Lanka cricket
  • sri lanka cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.