James Hopes Brad Haddin Resigned
Punjab Kings: आयपीएल २०२७ (IPL 2027) ची तयारी सुरू झाली आहे. त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीमध्ये मोठे बदल होत आहेत. सध्या पंजाब किंग्स संघातूनही एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सतत बदल होत आहेत. साईराज बहुतुलेने नुकताच पंजाबला निरोप दिला होता. आता आणखी दोन दिग्गज खेळाडूंनी फ्रँचायझी सोडली आहे. त्यामुळे पंजाबच्या कोचिंग स्टाफमध्ये फक्त रिकि पाँटिंगच उरले आहे.’
Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
फिल्डिंग प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी पंजाब किंग्स संघ सोडला आहे. होप्स आणि रिकी पाँटिंग यांनी एकत्र मोठ्या प्रमाणावर काम केले असून ते दिल्ली कॅपिटल्स संघाचाही भाग होते. दुसरीकडे, हॅडिन काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्समध्ये सामील झाले होते. आता, त्या दोघांनीही संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी अलीकडेच फ्रँचायझीला संघ सोडण्याबद्दल कळवले आहे. पंजाबला आता पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी तीन नवीन प्रशिक्षक शोधावे लागतील.
मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी आली आहे. नवीन सपोर्ट स्टाफची निवड करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँचायझी पाँटिंग यांच्या संपर्कात असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. व्यवस्थापन काही नावे सुचवू शकते, पण अंतिम निर्णय पाँटिंग यांचाच असेल. वृत्तानुसार, पंजाब डिसेंबरपूर्वी आपल्या नवीन प्रशिक्षकांची नावे जाहीर करू शकते. हॅडिन आणि जेम्स होप्स यांची नजर आता बीबीएलवर आहे. वृत्तानुसार, या दोघांनाही बिग बॅश लीगमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
आयपीएल २०२६ नंतर पंजाबला मोठा धक्का बसला. फिरकी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. बहुतुले २०२६ च्या आयपीएल पूर्वी पंजाबमध्ये सामील झाले होते. सुनील जोशींच्या जाण्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी पंजाबमध्ये मोठे बदल होऊ शकतात. फ्रँचायझी कोणत्या तीन अनुभवी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून संघात सामील करते, हे पाहणे बाकी आहे.
IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम






