
Dharmendra passway: "He was not an actor, but an era..." 'These' players including Virat and Sehwag paid tribute to Dharmendra
Cricketers pay tribute to Dharmendra : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर शोक संदेश लिहिले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही एक भावनिक संदेश लिहिला आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे “खरे आयकॉन” असे संबोधले गेले असून त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : Dharmendra passway : “तुम्ही फक्त उंचीनेच नव्हे तर…”, शिखर धवनने ‘हि-मॅन’ धर्मेंद्रला दिला अखेरचा निरोप
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गमावले : विराट कोहली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत विराट कोहलीकडून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याने लिहिले की, “आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गमावले, ज्यांनी आपल्या आकर्षण आणि प्रतिभेने सर्वांचे मन जिंकले आहेत. एक खरा आयकॉन ज्यांनी त्यांना पाहिले त्या सर्वांना प्रेरणा दिली. या कठीण काळात कुटुंबाला शक्ती मिळो. संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.” असा संदेश विराट लिहिला आहे.
धर्मेन्द्र जी सिर्फ अभिनेता नहीं थे, एक युग थे।
सादगी में सितारा, ताकत में ही-मैन और दिल में सोना।
उनकी फ़िल्में, उनका अंदाज़ और उनकी गर्मजोशी
पीढ़ियों तक याद रखी जाएगी।
एक महान कलाकार,
ईश्वर उनकी आत्मा को शांति दे। ॐ शांति #Dharmendra pic.twitter.com/fzaBN6kFrP — Virrender Sehwag (@virendersehwag) November 24, 2025
माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, “धर्मेंद्रजी हे फक्त एक अभिनेते नव्हते तर एक युग होते. साधेपणात एक तारा, ताकदीत एक नायक आणि सोन्याचे हृदय. त्यांचे चित्रपट, त्यांची शैली आणि त्यांची मैत्री पिढ्यानपिढ्या लक्षात राहणार आहेत. एक महान कलाकार, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.”
माजी भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने देखील धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “धर्मेंद्रजींना श्रद्धांजली, एक चिरंतन प्रतीक ज्यांचे सौंदर्य, ताकद आणि अतुलनीय आकर्षण भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमचा ठसा उमटवत आहे. त्यांच्या शक्तिशाली अभिनयापासून ते पडद्याबाहेरील त्यांच्या मैत्रीपर्यंत, त्यांनी असंख्य हृदयांना स्पर्श केला आणि पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांचे चित्रपट, त्यांचे स्मित आणि त्यांची आवड कायमची आपल्या आठवणींमध्ये कोरली जाणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.” असा संदेश हरभजन सिंग याने लिहिला आहे.
धर्मेन्द्र जी सिर्फ अभिनेता नहीं थे, एक युग थे।
सादगी में सितारा, ताकत में ही-मैन और दिल में सोना।
उनकी फ़िल्में, उनका अंदाज़ और उनकी गर्मजोशी
पीढ़ियों तक याद रखी जाएगी।
एक महान कलाकार,
ईश्वर उनकी आत्मा को शांति दे। ॐ शांति #Dharmendra pic.twitter.com/fzaBN6kFrP — Virrender Sehwag (@virendersehwag) November 24, 2025
कोलकाता नाईट रायडर्सने देखील धर्मेंद्र यांचा फोटो शेअर करून त्यानं “बॉलीवूडचा ही-मॅन” असे संबोधले आहे. फ्रँचायझीने संघाचे सह-मालक शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यासोबत धर्मेंद्र यांचा एक फोटो देखील पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की, “धर्मेंद्र जी, शांततेत राहा.”