शिखर धवनने 'हि-मॅन' धर्मेंद्रला दिला अखेरचा निरोप (फोटो-सोशल मीडिया)
Shikhar Dhawan bids final farewell to He-Man Dharmendra : हिन्दी सिने सृष्टिवर शोककळा पसरली आहे. अभिनेता धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे, त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. धर्मेंद्र हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “तुम्ही फक्त उंचच नव्हते तर धैर्याने देखील उंच होते. धर्मेंद्रजी, शक्ती देखील दयाळू असू शकते हे आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद.”
धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास देखील त्रास जाणवत होता आणि वयाशी संबंधित देखील इतर अनेक समस्या उद्भवल्या होत्या. रुग्णालयात आणि घरी सतत उपचार आणि देखरेख असूनही, त्यांची प्रकृती बिघडतच गेली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली परंतु, अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जेव्हा त्यांची तब्बेत बिघडली होती, तेव्हा सलमान खान, शाहरुख खान आणि गोविंदा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींकडून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आणि घरी भेट देण्यात आली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दुख:चा डोंगर कोसळल आहे.
You stood tall, not just in stature, but in spirit.
Dharmendra ji, thank you for showing us strength can be kind.
Om Shanti 🙏 pic.twitter.com/aruEYqtcHk — Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2025
हिंदी चित्रपटसृष्टीतील धर्मेंद्र यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. त्यांनी जवळजवळ सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्यांना बॉलिवूडचा “ही-मॅन” म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांनी १९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटाने त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी “शोला और शबनम”, “अनपढ”, “बंदिनी”, “पूजा के फूल”, “हकीकत”, “फूल और पत्थर”, “अनुपमा”, “खामोशी”, “प्यार ही प्यार” आणि “तुम” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी “हसीन मैं जवान”, “सीता और गीता”, “यादों की बारात” आणि “शोले” सारख्या अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम करून आपली छाप पाडली.






