
INDU19 vs BANU19: Abrar and Vaibhav Suryavanshi clashed in the U19 World Cup! Chaos in the ongoing match; read the details.
Chaos in the India vs Bangladesh match : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश आमनेसामने आले आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताने प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यु कुंडू यांकया अर्धशतकांच्या जोरावर १० बाद २३८ धावा केल्या आहेत. या सामन्यादरम्यान सूर्यवंशी आणि बांगलादेशी झवाद अब्रार यांच्यात वाद झाल्याचे पाहायाला मिळाले. वादाबाबतच तपशील अज्ञात असले तरी, त्यांच्या देहबोलीतून राग स्पष्टपणे दिसून येत होता. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
हेही वाचा : INDU19 vs BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ७२ धावांची खेळी केली आहे. त्याने ६७ चेंडूचा सामना करत ७२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ चकार तर ३ षटकार लगावले आहेत. या दरम्यान त्याने त्याच्या ७२ धावांच्या खेळीने इतिहास लिहिला आहे. पुरुषांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ५० पेक्षा जास्त धावा करणारा सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. त्याने केवळ १४ वर्षे आणि २९६ दिवसांच्या वयात ही कामगिरी बजावली आहे. असे करून सूर्यवंशीने अफगाणिस्तानच्या शाहिद उल्लाह कमालला पिछाडीवर सोडले आहे. ज्याने २०१४ मध्ये दुबईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावले तेव्हा त्याचे वय १५ वर्षे आणि १९ दिवस होते.
पाकिस्तानचा बाबर आझम देखील या यादीचा भाग आहे. त्याने २०१० मध्ये पामरस्टन नॉर्थ येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १५ वर्षे आणि ९२ दिवसांच्या वयात ही किमया साधली होती. या यादीत अफगाणिस्तानचा परवेझ मलिकझाई (२०१६ मध्ये फिजीविरुद्ध १५ वर्षे १२५ दिवस) आणि नेपाळचा शरद वेसावकर (२००४ मध्ये चितगाव येथे इंग्लंडविरुद्ध १५ वर्षे १३२ दिवस) यांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा
बंगालदेश संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताने बांगलादेशसमोर ४८.४ षटकात १० गडी गमावून २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून अभिमन्यु कुंडूने ११२ चेंडूत ८० धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार लागवले आहे. तसेच, भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने ६७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. बांगलादेशकडून अल फहादने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
भारताची प्लेइंग इलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हरवंश पनगालिया, आरएस अम्ब्रिस, हेनिल पटेल, दिपेश देवेंद्रन, खिलन पटेल
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन : एमडी रिफत बेग, झवाद अबरार, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), कलाम सिद्दीक अलीन, मोहम्मद रिझान होसन, मोहम्मद फरीद हसन फैसल (यष्टीरक्षक), मोहम्मद समीयून बसीर रातुल, शेख पावज जिबोन, अल फहाद, साद इस्लाम रझिन, इक्बाल हुसैन इमोन