फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या दिनाचा अहवाल – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये काल चौथा दिवस पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्ये चांगली कामगिरी केली. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी या पहिल्या सामन्यात आणखी दोन शतक झळकावले. भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने या सामन्यातील सलग दुसरे शतक झळकावले आहे. इंग्लंड साठी ब्रॅडोन कार्स आणि जॉश स्टंग या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले.
कार्स याने यशस्वी जयस्वाल, के एल राहुल आणि शुभमन गिल या तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला तर टंग याने शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना बाद केले. बेन स्टॉक्स आणि क्रिस वोक्स या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. शोएब बशीर संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर चौथ्या दिनी केएल राहुल याने त्याचे शतक पूर्ण केले त्याने 137 धावांची खेळी खेळणे यामुळे त्याने 18 चौकार मारले. शुभमन गिल हा चौथा दिनाच्या सुरुवातीलाच बाद झाला त्याने फक्त 8 धावा केल्या.
टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत याने 118 धावांची खेळी खेळली यात त्याने तीन षटकार आणि 15 चौकार मारले. करून नायर या सामन्यातही मोठी खेळ खेळण्यात अपयशी ठरला त्याने फक्त वीस धावा केल्या आणि विकेट गमावली. रवींद्र जडेजा याने 25 धावांची खेळ खेळली आणि नाबाद राहिला.
Stumps on Day 4 in Headingley 🏟️
England 21/0, need 350 runs to win
All eyes on the final day of the Test 🙌
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/MJOK5iFmBG
— BCCI (@BCCI) June 23, 2025
पहिल्या सामन्याच्या समाप्तीआधी इंग्लडच्या संघाने शेवटच्या चौथ्या इनिंगला सुरुवात केली आहे. काल त्याचे सहा ओव्हर पार पडले यामध्ये त्यांनी एकही विकेट न घेता 21 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्याव्यतिरिक्त साई सुदर्शन याने ३० धावांची खेळी खेळली. तर करुण नायर याने संघासाठी २० धावा करुन विकेट गमावली. रविद्र जडेजा याने संघासाठी 25 धावा केल्या आणि नाबाद राहिला त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने 10 चा आकडा पार केला नाही.
भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची असणार आहे, भारतीय संघाच्या गोलंदाजीवर आज चाहत्यांचे लक्ष असणार आहे. दुसरा सामना हा 2 जूलै पासुन सुरु होणार आहे, त्याआधी भारतीय महिला संघ इंग्लड महिला संघाविरुद्ध खेळणार आहे.