
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची 'ही' आकडेवारी पाहून तुमची झोपच उडेल (Photo Credit- X)
आकडेवारीवर नजर टाकल्यास, आयसीसी टी-२० विश्वचषकात जेव्हा जेव्हा भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने आले आहेत, तेव्हा तेव्हा कॅरेबियन संघाने भारताला घाम फोडला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एकूण ४ सामने झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या ४ पैकी ३ सामन्यांत वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे, तर भारतीय संघाला केवळ १ वेळाच यश मिळाले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांचे खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचा कल बदलण्यास सक्षम आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने मागील सामन्यात जिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मात्र, बाद फेरीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा रेकॉर्ड पाहता सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
१ मार्चला होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाला आपला जुना खराब रेकॉर्ड पुसून टाकण्याची मोठी संधी आहे. वेस्ट इंडिज आपल्या मागील सामन्यात पराभूत होऊन मैदानात उतरणार आहे, तर भारत विजयाचा अनुभव घेऊन खेळणार आहे. हा मानसिक फायदा भारताला होऊ शकतो. मात्र, विंडीजच्या ‘पॉवर हिटर्स’ला रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.