Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND : बेन स्टोक्सने टाॅस जिंकला पण एक चुक पडली महागात! सल्लागार टिम साउथी कर्णधाराच्या समर्थनात

इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी सल्लागार टिम साउथी यांनी कर्णधार बेन स्टोक्सच्या हेडिंग्लेच्या कोरड्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 21, 2025 | 02:05 PM
फोटो सौजन्य – ICC

फोटो सौजन्य – ICC

Follow Us
Close
Follow Us:

टिम साउथी : टीम इंडियाची लढत ही बेन स्टोक्सच्या संघाविरुद्ध सुरू आहे. मागील 18 वर्षे भारतीय संघावर धबधबा दाखवणारा बेन स्टोक्स काल फिका पडला. काल इंग्लिश गोलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. याचे नुकसान त्यांना नक्कीच मोहब्बत पडणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने त्यांचा दबदबा दाखवायला सुरुवात केली आहे. भारतीय युवा संघ कालपासून इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करताना दिसत आहे ती मीडियाच्या दोन खेळाडूंनी एकाच दिवशी शतक झळकावले. 

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्या दिनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा सुरुवातीचा निर्णय म्हणजेच नाणेफेकीचा निर्णय हा इंग्लंडच्या बाजूने वळला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारताच्या संघासमोर फलंदाजीचा उभे राहिले. नाणेफेकीच्या नंतर इंग्लडला हा निर्णय चांगलाच महागात पडला आहे असे दिसुन येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी सल्लागार टिम साउथी यांनी कर्णधार बेन स्टोक्सच्या हेडिंग्लेच्या कोरड्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

सुरुवातीच्या सत्रात खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, परंतु भारताच्या तरुण आणि प्रतिभावान फलंदाजांनी त्यांच्या शानदार कामगिरीने त्यांना निराश केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला कारण कर्णधार शुभमन गिल नाबाद १२७ केल्या आहेत आणि यशस्वी जयस्वाल १०१ धावा करुन यांनी कोरड्या खेळपट्टीवर शतके ठोकली, ज्यामुळे भारताला शुक्रवारी पहिल्या दिवशी तीन बाद ३५९ धावा करता आल्या.

ENG vs IND : पहिला सामना दोन शतक! भारताच्या फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना धुतलं, वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल

इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सच्या निर्णयावर माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी जोरदार टीका केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत साउथी म्हणाले, “कालच्या खेळपट्टीचा रंग आणि त्यात काही ओलावा पाहता, जर त्याने थोडीशी मदत केली असती तर कदाचित त्याचा परिणाम आज सकाळी दिसून आला असता. या निर्णयावर आधारित हा निर्णय घेण्यात आला.”

तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही खेळपट्टीचे मूल्यांकन करता तेव्हा तुम्ही त्यावर आधारित निर्णय घेता. प्रत्येक वेळी तुमचा निर्णय बरोबर असेलच असे नाही.” तथापि, न्यूझीलंडच्या माजी वेगवान गोलंदाजाने परिस्थितीशी जुळवून घेतल्याबद्दल आणि इंग्लंडचा निर्णय चुकीचा सिद्ध केल्याबद्दल भारतीय फलंदाजांना पूर्ण श्रेय दिले.

Web Title: Eng vs ind ben stokes wins the toss but one mistake cost him dearly advisor tim southee backs the captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • ben stokes
  • IND Vs ENG
  • India vs England
  • Tim Southee

संबंधित बातम्या

Ashes series 2025 : अ‍ॅशेसच्या लढाईपूर्वी इंग्लंडने खेळला पहिला डाव! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी संघ जाहीर
1

Ashes series 2025 : अ‍ॅशेसच्या लढाईपूर्वी इंग्लंडने खेळला पहिला डाव! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी संघ जाहीर

IPL 2026 च्या आधी न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केकेआरमध्ये सामील, शाहरुख खानच्या संघात स्वीकारली महत्त्वाची जबाबदारी
2

IPL 2026 च्या आधी न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केकेआरमध्ये सामील, शाहरुख खानच्या संघात स्वीकारली महत्त्वाची जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.