फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कालपासून म्हणजेच 20 जून पासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे या कसोटी मालिकेचा पहिला सामन्याचा पहिला दिवस काल पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची सुरुवात करून पहिल्या दिनी तीन विकेट्स गमावून 359 धावा केल्या आहेत. भारताच्या संघाने वोक्स त्याचबरोबर स्ट्रोक्स यांसारख्या अनुभवी फलंदाजांना देखील सोडल नाही. भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी त्याचे इंग्लंडमध्ये पहिल्या शतक झळकावले.
त्याचबरोबर भारताचा नवा कर्णधार शुभम गेली आणि त्याच्या कॅप्टनसी मध्ये पहिल्याच सामन्यात त्याचे पहिले शतक नावावर केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये पहिल्या दिनी भारतीय संघाचा धबधबा पाहायला मिळाला. पदार्पण करणारा साई सुदर्शन त्याचे चौथ्या चेंडूवर एकही धाव न करता पवेलियनमध्ये परतला. त्याव्यतिरिक्त सर्व फलंदाजांनी भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामधील अहवाला बद्दल सांगायचं झाले तर बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पहिले फलंदाजी करत असताना केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. केएल राहुल याचा भारतीय संघाने पहिला विकेट गमावला त्याने भारतासाठी 42 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने आठ चौकार मारले. यशस्वी जयस्वाल टीम इंडियासाठी सातत्याने चांगले कामगिरी करत आहे त्याच्या लहान करिअरमध्ये त्याने त्याचे तिसरे शतक झळकावले आहे तर इंग्लंडमधील हे त्याचे पहिले शतक आहे. त्याने टीम इंडियासाठी पहिल्याच दिनी 101 धावांची खेळी खेळली. त्यानंतर बँक स्टॉक याने त्याला स्टंप आऊट केले.
Stumps on the opening day of the 1st Test!
An excellent day with the bat as #TeamIndia reach 359/3 🙌
Captain Shubman Gill (127*) and Vice-captain Rishabh Pant (65*) at the crease 🤝
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/kMTaCwYkYo
— BCCI (@BCCI) June 20, 2025
भारताचा कर्णधार शुभमन गिल कालच्या दिनाच्या समाप्तीनंतर त्याने शतक झळकावून नाबाद आहे. त्याने १२७ धावांची खेळी पहिल्या दिनी खेळली आहे. त्याने यामध्ये १६ चौकार आणि १ षटकार मारला. भारताचा उपकर्णधार रिषभ पंत याने देखील कालच्या दिनी कमालीचा खेळ दाखवला आहे. त्याने 65 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 2 षटकार आणि ४ चौकार मारले. भारतीय संघासाठी ही खेळी महत्वाची होती, टीम इंडीयाने पहिल्या दिनी चांगली कामगिरी केली आहे.