इंग्लंडविरुद्ध शुभमनचे शानदार शतक (फोटो- सोशल मिडिया/bcci)
India Vs England: सध्या भारत अनू इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतळ. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला आहे.टिम इंडियाने पहिल्या दिवस अखेर ३ विकेट गमावून ३५९ धावा केल्या आहेत. यशस्वी, शुभमन, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी मैदान गाजवले आहे. |
पहिल्या दिवशीच खेळ संपला तेव्हा शुभमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी नाबाद परतली आहे. शुभमन गिलने कर्णधार झाल्यावर पहिलाच सामन्यात तूफान फलंदाजी केली आहे. शुभमन गिलने शानदार शतक ठोकले आहे. तर उपकर्णधार ऋषभ पंतने देखील नाबाद ६५ धावा केल्या आहेत.
𝗥𝗮𝘄 𝗘𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀
Straight from the #TeamIndia Dressing Room after the end of an exciting Day 1 at Headingley#ENGvIND pic.twitter.com/oj4kWMSbeW
— BCCI (@BCCI) June 20, 2025
यशस्वी बाद झाल्यावर ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कर्णधार शुभमन गिलला चांगलीच साथ दिली. दोघांनी मिळून १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. शुभमन गिलने १४० चेंडूमध्ये १२७ धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताच्या डावाची सुरवात केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची मोठी भागीदारी रचली. परंतु, राहुल ४२ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला.
लीड्समध्ये Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास
भारतीय संघासाठी सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी हेडिंग्ले येथे शानदार फलंदाजी केली. या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी रचली. केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या विकेट गमावल्यावर शुभमनच्या साथीने जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचे पिसं काढली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणताची संधी दिली नाही. या दरम्यान यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून विक्रम रचला आहे. यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडमध्ये शतक साकारणारा पहिला डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी कुणाही भारतीय फलंदाजाला हा विक्रम करता आलेला नाही. यशस्वी जयस्वालने १५४ चेंडूचा सामना करत १०० धावा केल्या. त्याने या खेळीत १६ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.