Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs PAK: राव कसला हा खेळ! चक्क बॉलच फोडला; जोश टंग अन् रॉबिन्सनने कसा केला पाकिस्तानचा गेम ओव्हर…

Josh Tongue- Ollie Robinson took 5 Wickets in Eng vs Pak: इंग्लंडचे ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी पाकिस्तानविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत शानदार कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेतले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 05:43 PM
ENG vs PAK: राव कसला हा खेळ! चक्क बॉलच फोडला; जोश टंग अन् रॉबिन्सनने कसा केला पाकिस्तानचा गेम ओव्हर…
Follow Us
Follow Us:
  • जोश टंग-ऑली रॉबिन्सनचा कहर
  • पाकिस्तानला लोळवल्यानंतर चेंडूचे केले दोन तुकडे
  • 28 वर्षांनंतर रचला इतिहास
हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेत पाकिस्तानला पहिल्या डावात केवळ १७१ धावांवर गुंडाळले. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांत प्रथमच असे घडले की, दोन इंग्लिश वेगवान गोलंदाजांनी एकाच डावात पाच विकट्स घेतले.या ऐतिहासिक कामगिरीची आठवण ठेवण्यासाठी रॉबिन्सन आणि टंग यांनी चक्क चेंडूचे दोन तुकडे केले.

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला

हेडिंग्ले येथे इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १७१ धावांवर सर्वबाद झाला. ऑली रॉबिन्सनने १८ षटकांत ५१ धावा देऊन ५ विकट्स घेतले. जोश टंगनेही ९.१ षटकांत ४६ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखले.

चक्क चेंडूचे केले दोन तुकडे

जेव्हा एखादा खेळाडू फिफर म्हणजेच पाच विकेट्स घेतो, तेव्हा तो चेंडू स्वतःकडे ठेवतो. एका डावात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेणे क्वचितच घजचे. म्हणूनच जेव्हा रॉबिन्सन आणि टंग यांनी हा पराक्रम केला, तेव्हा त्यांनी एक अनोखा निर्णय घेतला. त्यांनी चेंडूचे दोन तुकडे करून तो स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले. क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, पाच विकेट्स घेणाऱ्या दोन गोलंदाजांनी चेंडू अर्धा कापून तो आपापसात वाटून घेतला.

Josh Tongue and Ollie Robinson have had the ball split in half so they can both have a momento from their five-wicket hauls 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🏏 Brilliant picture by @dudleyplatypus 📸#ENGvPAK pic.twitter.com/a5yUZIvuMx — England’s Barmy Army 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🎺 (@TheBarmyArmy) August 19, 2026

रॉबिन्सन आणि टंग काय म्हणाले?

इंग्लंड क्रिकेटने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ऑली रॉबिन्सन आणि टंग यांनी चेंडूचे दोन तुकडे केल्यानंतर आपले मत मांडले आहे. टंगने स्पष्ट केले की, ही कल्पना त्याला ऑलीने दिली होती आणि त्याने पहिल्यांदा अशी गोष्ट स्वतः च्या डोळ्यांनी पाहिली. रॉबिन्सनने सांगितले की, टीम मॅनेजर वेन बेंटलीने पाच मिनिटांत चेंडूचे दोन तुकडे केले. आणि हा क्षण तो कधीही विसरणार नाही.

२८ वर्षांनंतर दिसलेले एक अनोखे दृश्य

टंग आणि रॉबिन्सन आता इंग्लंडसाठी एकाच कसोटी डावात पाच विकेट्स घेत इतिहास रचला आहे. २८ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारी ही पहिली इंग्लिश वेगवान गोलंदाजांची जोडी ठरली आहे. यापूर्वीचा विक्रम १९९८ मध्ये अँडी कॅडिक आणि अँगुस फ्रेझर यांनी केला होता. त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेतले होते.

टॉम रिचर्डसन आणि जॅक हर्न यांनी १८९६ मध्ये लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेऊन हा पराक्रम केला होता. इंग्लंडच्या दोन गोलंदाजांनी एकाच डावात पाच विकेट्स घेण्याची पहिली वेळ १८८८ मध्ये होती, जेव्हा जॉर्ज लोहमन आणि बॉबी पील यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Web Title: Eng vs pak josh tongue ollie robinson took 5 wicket record cuts ball in half

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Josh Tongue
  • PAK vs ENG
  • Test Match

संबंधित बातम्या

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम
1

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.