फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या टी 20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती काल या मालिकेचा दुसरा सामना पार पडला यामध्ये इंग्लंडच्या संघाने पलटवार केला आहे इंग्लंडच्या संघाने २० ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट्स गमावून ३०० हून अधिक धावा करून धुमाकूळ घातला होता. यामध्ये फिल सॉल्ट याने शतक झळकावले आणि नाबाद खेळी खेळली. इंग्लडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 146 धावांनी पराभूत केले.
इंग्लड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगलाच महागात पडला. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत ३०४ धावा केल्या. त्याच्या प्रत्यारात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंडने १६.१ ओव्हरमध्ये ऑल आऊट करून मालिकेमध्ये बरोबरी केली.
PAK vs Oman Live Score: पाकिस्तानच्या स्पिनर्सची जादू, अवघ्या 67 धावांमध्ये गुंडाळला ओमानचा संघ
इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज फिल्ल सॉल्ट आणि जोस बटलर या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाना धू धू धुतलं. फिल्ल सॉल्ट याने संघासाठी फक्त ६० चेंडूमध्ये १४१ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ षटकार आणि १५ चौकार मारले. तर जोस बटलर याने ३० चेंडूमध्ये ८३ धावा केल्या यामध्ये त्याने ७ षटकार आणि ८ चौकार मारले. उर्वरित काम हे जेकब बेथल आणि हॅरी ब्रुक या दोघांनी केले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाचा कर्णधार एडन मार्करम याने ४१ धावांची संघासाठी सर्वाधिक धावसंख्या केली तर डोनोव्हन फरेरा याने ३१ धावांची खेळी खेळली या व्यतिरिक्त सर्व फलदाज फेल झाले आणि संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
🦁 VICTORY! 🏴
Our biggest IT20 winning margin, by 146 runs 💪
The series is level with one match to play 🏏 pic.twitter.com/8XDDdBnPPw
— England Cricket (@englandcricket) September 12, 2025
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ १६.१ षटकात १५८ धावा करून सर्वबाद झाला आणि १४६ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंड संघाने टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. त्याचबरोबर, हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा टी२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ३४२ धावांनी पराभव केला होता. हा एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव देखील आहे.