
सामन्याच्या 1 दिवस आधी इंग्लंडने जाहीर केला संघ
भारताविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्याला एक दिवस शिल्लक असताना इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या संघात जोश टंगचा समावेश करण्यात आला आहे. त्याने आधी इंटरनॅशनल सामना खेळला आहे.
Two changes for Manchester 🔁 Click below for the full story: — England Cricket (@englandcricket) July 3, 2026
मात्र त्याला टी 20 इंटरनॅशनल सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच या सामन्यात जोफ्रा आर्चरची घरवापसी झाली आहे. तो पहिला सामना खेळू शकला नव्हता. या दोन्ही खेळाडूंचा समावेश झाल्याने ल्यूक वूड आणि सकीब महमूद संघाबहेर गेले आहेत.
भारतीय संघाने अद्याप आपली प्लेइंग 11 जाहीर केलेल्या नाही. उद्या जेव्हा टॉस होईल तेव्हाच भारताचा संघ काय असणार आहे ते तेव्हाच कळणार आहे. वैभव सूर्यवंशीला उद्या डेब्यू करण्याची संधी दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार
भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. आयर्लंडविरुद्धचे 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा 1 सामना संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभवला स्थान मिळेल, त्याला डेब्यू करण्याची संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र वैभवला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला भारतीय मॅनेजमेंट डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.