मुंबई : ज्या शहराला थांबणे ठावूक नाही तिथे आज पाऊले ऐकमेका मागून धावत होती. मॅरेथॉनचे यंदा ‘हर दिल मुंबई’ (Har dil Mumbai) असे ब्रीद वाक्य आहे. वरळी (Worli) सिलिंकवर धावपटूंची पडणारी वेगवान पावले आणि ‘हर दिल मुंबई’ नाऱ्यासह दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर उसळलेला धावपटूंचा समुदाय असं चित्र आज मुंबईत पाहयला मिळाले. हा रंगदार आणि जिद्दीचा माहोल आज रविवारी मुंबईत पाहायला मिळला. जगभरातील धावपटूंचे ( World Runners) आकर्षण असलेल्या ‘मुंबई मॅरेथॉन’चे (Mumbai Marathon) यंदा १८ वे वर्ष मोठ्या दिमाखात पार पडले. या स्पर्धेत इथोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा विजेता झाला आहे तर, भारतीयांमध्ये एलिट भारतीयांमध्ये गोपी.टी हा विजेता ठरला आहे.
इथोपियाचा हायले लेमी पहिला, केनियाचा फिलेमन रोनो दुसरा…
दरम्यान, टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये इथोपियाचा धावपटू हायले लेमी (Hayley Lemmy) यांने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्याने २ तास ०७ मिनिटं २८ सेंकदात पूर्ण केली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर (केनिया) फिलेमन रोनो, २ तास ८ मिनिटे ४४ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावर हेलू झेदू इथोपिया २ तास १० मिनिटे २३ सेकंद, अशी विजेत्यांची नावं आहे.
कोरोनामुळं दोन वर्ष खंड…
मागील दोन वर्ष कोरोनामुळं ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतू या वर्षी उत्साहाने पुन्हा एकदा मुंबईकर व जगातील स्पर्धक आज उतरले होते. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला आज सकाळी ५.१५ वाजता सुरुवात झाली. ४२.१९७ किलोमीटरची मॅरेथॉन असून, यात ५५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये मॅरेथॉन पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉन स्पर्धेस सुरूवात झाली, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू झाली.
५५ हजारांहून अधिक धावपटू सहभाग…
दरम्यान, यंदा ही स्पर्धा तब्ब्ल दोन वर्षानंतर होत असल्यामुळं स्पर्धकांचा जोश, उत्साह कमालीचा आहे. त्यामुळं मॅरेथॉनमध्ये ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग शहराच्या मध्यभागातून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून तो सुरू होईल, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू होईल. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटू ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दक्षिण मुंबईतील विविध महत्त्वपूर्ण इमारतींच्या सहवासात धाव घेतील.
अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य आकर्षक…
अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) या स्पर्धेसाठी यंदा मुख्य आकर्षक असणार आहे. नृत्यकौशल्य आणि अभिनयासह फिटनेससाठी आग्रही असलेला टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा ब्रॅन्डअॅम्बेसिडर आहे. टायगर श्रॉफच्या फिटनेसमुळे तो सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. हेच लक्षात घेऊन यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून टायगरला मॅरेथॉनचा चेहरा बवण्यात आले आहे; जेणेकरून अधिकाधिक तरुण आपल्या फिटनेसविषयी जागृत होतील. अशी माहिती मीडिया आणि जनसंपर्कचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक पिळणकर यांनी सांगितले.