मुंबई : भारतात सध्या रोड सेफ्टी सीरीजचा (Road Safety Series) दुसरा हंगाम खेळवला जात असून यात अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरत चौकार षटकारची आतिषबाजी करताना पहायला मिळत आहेत. या स्पर्धेत इंडिया लीजेंड्सनं (India Legends) ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (Australia Legends) पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली. मात्र या अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याने न डंकचा अशक्य असलेला झेल पकडून आपली कमाल दाखवली. रैनाचा हा व्हिडीओ माजी क्रिकेटपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) ट्विट करत रैनाचे कौतुक केले. मात्र या व्हिडीओ खाली अमितला चाहत्याची एक अशी कमेंट आली कि ती पाहून सर्वचण अवाक झाले.
Bhai @imraina, can I borrow your Time Machine? It’s mesmerising to see you field like old times. ?? https://t.co/5YIvJAKELW
— Amit Mishra (@MishiAmit) September 29, 2022
अमित मिश्राने केलेल्या ट्विटवर एका चाहत्यानं गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी आमितकडे ३०० रुपयांची मागणी केली. अमित मिश्रानंही त्याच्या मागणीला प्रतिसाद दिला. अमित मिश्राने कशाचाही विचार न करता त्याला ५०० रूपये गूगल पे केले. ज्याचा स्क्रीनशॉट स्वत: अमित मिश्रानं सोशल मीडियावर शेअर केला. अमित मिश्राचा हा स्क्रीनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Done, all the best for your date. ? https://t.co/KuH7afgnF8 pic.twitter.com/nkwZM4FM2u
— Amit Mishra (@MishiAmit) September 29, 2022