नवी दिल्ली – FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात थोड्याच वेळात सुरू होणार आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर रात्री 8:30 वाजता सामना सुरू होईल. सामन्यापूर्वी समारोप समारंभही आयोजित केला जाणार आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार नोरा फतेही परफॉर्म करणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगही कतारला पोहोचले आहेत. दीपिका फिफा विश्वचषक ट्रॉफी सादर करणार आहे.
1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. विश्वविजेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे काही तासांमध्ये कळणार आहे.
दोन्ही संघांतील प्लेअर्स
फ्रान्स : ह्यूगो लोरिस (गोलकीपर, कर्णधार), ज्युल्स कौंडे, राफेल वराणे, डायट उपमाकानो, थियो हर्नांडेझ, अँटोइन ग्रिजमन, ऑरेलियन चौमेनी, अॅंड्रिएन रॅबिओट, ओस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर गिरौड, किलियन एमबाप्पे.
अर्जेंटिना : एमिलियानो मार्टिनेझ (गोलकीपर), नहुएल मोलिना, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, निकोलस टॅगलियाफिको, रॉड्रिगो डी पॉल, एन्झो फर्नांडीझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर, एंजल डी मारिया, लिओनेल मेसी,(कर्णधार), ज्युलियन अल्वारेझ.