
Cristiano Ronaldo: Footballer Cristiano Ronaldo is set to reach the 1000-goal milestone! He expressed his determination.
Cristiano Ronaldo is set to reach the 1000-goal mark! : फुटबॉल या खेळात ज्याने आपले नाव अढळ केले आहे असा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने एक नवा निधार केला आहे. या दिग्गज फुटबॉलपटूने त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस १००० गोल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ४० वर्षीय पोर्तुगीज महान खेळाडूला विश्वास आहे की तो हे ध्येय साध्य करेल. उच्च-स्तरीय व्यावसायिक फुटबॉलमध्ये त्याचे ९५६ गोल डागले आहेत.
दुबई येथे पार पडलेल्या “ग्लोब सॉकर अवॉर्ड्स” समारंभात रोनाल्डोला मध्य पूर्वेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी बोलताना नाल्डोने म्हणाला की, “जर दुखापत झाली नाही तर मी निश्चितच हा टप्पा गाठेन.” शनिवारी सौदी प्रो लीगमध्ये रोनाल्डोने अल-नासरसाठी दोन गोल केले, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीची एकूण संख्या ९५६ झाली. त्याच्या यादीत पोर्तुगालसाठी १४३ गोलचा पुरुष आंतरराष्ट्रीय विक्रम समाविष्ट आहे.
हेही वाचा : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCB ने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना दिला नारळ
रोनाल्डो पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकात पोर्तुगालचे नेतृत्व करणार आहे. हा विश्वचषक सुरू होईल तेव्हा तो ४१ वर्षांचा असेल. रिअल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस सारख्या प्रमुख संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा स्ट्रायकर म्हणाला, “मी अजूनही पुढे जाण्यासाठी खूप प्रेरित आहे. मी कुठेही खेळतो (मध्य पूर्व, युरोप किंवा इतरत्र) हे महत्त्वाचे नाही. मला नेहमीच फुटबॉल खेळणे, ट्रॉफी जिंकणे, गोल करणे आवडते आणि मला असेच पुढे जायचे आहे.”
पीसीबीकडून राष्ट्रीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांच्याशी करार संपण्याच्या तीन महिने आधी त्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. अझहरचा करार मूळतः मार्च २०२६ पर्यंत चालणार होता, परंतु बोर्डाने त्यांना अकालीच पदावरून दूर केले. अझहर महमूद यांची मागील वर्षी कसोटी मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा बोर्डासोबत दोन वर्षांचा करार देखील होता. पीसीबीकडून आता कसोटी संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.