फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आर अश्विन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने पार पडले. यामध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत करून जेतेपद नावावर केले. यामध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजीवर त्याचबरोबर फलंदाजीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर मालिकेच्या दरम्यान भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने निवृत्तीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. त्याला बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने घेतलेल्या निवृत्तीवर सर्वानाच धक्का बसला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विन याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. त्याला भारतीय संघाने शेवटचा सामना न खेळता निवृत्ती घ्यावी लागली यावेळी चाहते देखील निराश झाले होते.
आता टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला आहे. आर अश्विनने सांगितले की तो आणखी खेळू शकला असता, परंतु त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला कारण त्याने निवृत्ती का घेतली नाही हे लोकांनी विचारावे असे त्याला वाटत नव्हते. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. तो दुसरा कसोटी सामना खेळला आणि तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला. पहिल्या कसोटी सामन्यातही त्याला स्थान मिळू शकले नाही.
Ranji Trophy 2025 : हा तुफानी फलंदाज रणजी ट्रॉफीत खेळणार, सरफराज खानला मोठा झटका
आता रविचंद्रन अश्विनने त्याच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर निवृत्तीबद्दल सांगितले, “माझ्या क्रिकेटमध्ये अधिक ताकद होती. मी आणखी क्रिकेट खेळू शकलो असतो, पण जेव्हा लोक तुम्हाला ‘का नाही’ विचारतात, तेव्हा तुम्ही ‘निवृत्ती का घेतली’ हे विचारण्याऐवजी. अशा प्रकारे खेळ संपवणे चांगले.” अश्विनने असेही सांगितले की तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबद्दल जास्त बोलत नाही कारण काही काळापूर्वी तो स्वतः त्या गटाचा भाग होता. अशा परिस्थितीत त्याला आपल्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे नव्हते.
आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो अजूनही आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच CSK ने त्याला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. याशिवाय ते क्लब क्रिकेटही खेळू शकतात. मात्र, जोपर्यंत तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत तो रिटायर्ड प्लेअर्स लीगमध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत ते कोणत्या स्थितीत आहेत हे आयपीएल २०२५ च्या कामगिरीनंतर दिसेल. त्याचा फॉर्म चांगला राहिल्यास चेन्नई सुपर किंग्ज त्याला पुढील हंगामातही कायम ठेवेल. जर तो चांगला खेळला नाही तर त्याला सोडले जाण्याची शक्यता आहे.