फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रणजी ट्रॉफी 2024-25 : भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये घराच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. एवढेच नव्हे तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभवानंतर भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे स्थान गमवावे लागले. मागील सातत्त्याने होणाऱ्या पराभवामुळे भारतीय संघाचे कोच त्याचबरोबर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्यांची निराशा व्यक्त केली आहे.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आता टीम इंडियाचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली आहे.
🚨 JAISWAL TIME IN RANJI TROPHY. 🚨
– Yashasvi Jaiswal confirmed his availability for the Ranji match against Jammu on 23rd January. (Express Sports). pic.twitter.com/IEtv17MuKj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2025
रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून खेळवला जाणार असून, त्याच दिवशी मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात सामना होणार आहे. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल झळकणार आहे. जयस्वालच्या रणजीमध्ये खेळण्याबाबत, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सला पुष्टी दिली आहे की यशस्वी जैस्वाल यांनी आगामी रणजी सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांना आधीच कळवले आहे. निवडकर्ते या आठवड्यात मुंबई संघाची निवड करतील. यशस्वी जैस्वाल इंग्लंडसोबतच्या ५ सामन्यांच्या T२० मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नसल्यामुळे तो रणजीमध्ये खेळणार आहे असे सांगितले जात आहे.
यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली होती. या दौऱ्यात जैस्वालनेही शानदार शतक झळकावले. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पाच सामन्यांमध्ये फलंदाजी करताना जयस्वालने ३९१ धावा केल्या आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता.
🚨 YASHASVI JAISWAL SMASHED MOST RUNS FOR INDIA IN THE OPENING OVER OF A TEST INNINGS. 🚨pic.twitter.com/dGEa2lSbSS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
दुसरीकडे, स्फोटक फलंदाज सर्फराज खानला या सामन्यात खेळणे कठीण मानले जात आहे. वास्तविक, सरफराजच्या बरगड्याला झालेल्या दुखापतीमुळे तो या सामन्याला मुकणार आहे. सर्फराजबद्दल एमसीएच्या सूत्राने सांगितले की, “सरफराजला बरगडी दुखापत झाली आहे आणि त्याने आम्हाला पुढील रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्याविषयी माहिती दिली आहे.”