
अमित मिश्राचे विराट, अनिल कुंबळेवर गंभीर आरोप
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या ‘बैठ अँड बोल’ या पॉडकास्टमध्ये बोलताना अमित मिश्राने याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हे नक्की प्रकरण काय आहे त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
Virat Kohli did not fulfill his promise – Amit Mishra Baith & Bol Ep 009 is releasing today 6 P.M. on Youtube. Facebook. Spotify #Baithandbol #AmitMishra #Cricket https://t.co/ndE4zjIVIu — Aakash Chopra (@cricketaakash) October 23, 2026
भारताचा माजी अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राने पॉडकास्ट दरम्यान आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटाबाबत एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा खुलासा केला आहे. बंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेलेला आपला शेवटचा सामना आणि त्यानंतर त्याच्या करकीर्दीला लागलेला ब्रेक याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने विराट आणि अनिल कुंबळे बाबत देखील भाष्य केले आहे.
IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
अमित मिश्रा म्हणाला, ‘ सामन्यादरम्यान बंगळुरूमध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली होती. जेव्हा तो दुखापतग्रस्त होऊन बाहेर परतत होता, त्या वेळी अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मिश्राने सांगितले की, ‘जेव्हा त्याने अनिल कुंबळेशी चर्चा केली तेव्हा त्यांनी त्याला धीर देत म्हटले होते, “चिंता करू नकोस. तू जसा पूर्णपणे फिट होशील, तू संघात परत येशील.’ त्यानंतर जेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार बनला, तेव्हा मिश्राने त्यालाही विचारले होते की, भाऊ, आता पुढे काय करायला हवे? त्यावर विराटनेही असेच आश्वासन दिले होते, “तू चिंता करू नकोस. फक्त पूर्णपणे फिट हो, मग तू संघात परत येशील.’
दोन्ही दिग्गजांकडून अशा प्रकारे सकारात्मक व आश्वस्त करणारी उत्तरे मिळाल्यानंतर अमित मिश्राने पुनरागमनासाठी पूर्ण मेहनत घेतली. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होऊनही त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली नाही, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अचानक आणि निराशाजनक अंत झाला, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर कुंबळे आणि कोहली काही उत्तर देणार का हे पहावे लागणार आहे.
IND Vs AFG: खेळ खल्लास करण्यासाठी ‘हे’ धुरंदर संघात हवेतच; Anil Kumble ने केली मोठी मागणी
Ans: अमित मिश्राची कारकीर्द 2017 मध्ये थांबली असल्याचे म्हटले जाते.
Ans: संघात परत घेण्याचे आश्वासन दोघांनी पाळले नसल्याचे म्हणणे मिश्राचे असल्याचे समोर येत आहे.