From cricketer to basic education officer! Rinku Singh starts a new innings; How much salary will she get?
Rinku Singh becomes Basic Education Officer : क्रिकेट विश्वात २० फॉरमॅटमध्ये स्फोटक फलंदाज म्हणून रिंकू सिंगला सारे ओळखतात. त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या छोट्या टी-२० कारकिर्दीत त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. क्रिकेटमधून ओळख मिळण्यापूर्वी तो खूप संघर्षातून गेला आहे. आता उत्तर प्रदेश सरकारकडून रिंकू सिंगला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने रिंकू सिंगला बेसिक एज्युकेशन ऑफिसरपदी नियुक्त केले आहे. याचा अर्थ आता क्रिकेटशिवाय रिंकू शिक्षण क्षेत्रातही त्याच्या राज्याची सेवा करताना दिसणार आहे. रिंकू सिंग समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत लग्न करणार आहे. याधी त्यांचा शाही साखरपुडा पार पडला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : लीड्स कसोटी सामन्यात टाळ्या वाजवणारी ‘ती’ कोण? ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर तूफान व्हायरल..
दरम्यान, आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, शिक्षण अधिकारी झाल्यानंतर रिंकू सिंगला यूपी सरकार किती पगार देणारा आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. क्रिकेटर रिंकू सिंगला शिक्षण अधिकारी झाल्यानंतर किती पगार मिळेल याबाबदळ आपण जाणून घेऊया.
क्रिकेट व्यतिरिक्त, रिंकू सिंगला आता यूपी सरकारकडून देखील पैसे मिळणाराहे. त्याचे कुटुंब यामुळे खूप आनंदी असल्याची माहीती आहे. आता तो बेसिक एज्युकेशन ऑफिसर बनला आहे, त्यामुळे त्याला या काळात राष्ट्रीय पेन्शन योजनांचा लाभ मिळेल. या पदाच्या पगाराबद्दल बोललो तर, अहवालानुसार, रिंकूला यूपी सरकारकडून सुमारे ५७ हजार ते ६२ हजार पगार देण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : टिम इंडियाच्या अडचणीत वाढ! इंग्लंडचा ‘हा’ घातक खेळाडू ४ वर्षांनी परतला संघात
तथापि, शिक्षण अधिकाऱ्याचा बेसिक पगार सुमारे ४७ हजार इतका आहे. या काळात, रिंकूच्या पगारात प्रवास भत्त्यापासून ते डीए आणि एचआरएपर्यंतचा खर्च देखील समाविष्टया असणार आहे. रिंकू सिंगला क्रिकेटशिवाय ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. जेव्हा तो क्रिकेटपासून मुक्त होईल तेव्हा तो यूपीमध्ये शिक्षणासाठी काम करताना दिसणार आहे.
आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकवणाऱ्या भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या स्थानावर पोहोचला, त्याचे कारण इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दोन शतके झळकावणे हे आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या विजयादरम्यान ६२ आणि १४९ धावा काढून सामनावीर ठरलेला बेन डकेट पाच स्थानांनी झेप घेऊन क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.