जोफ्रा आर्चर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. तर आता दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ अधिक शक्तिशाली झाला आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर आता इंग्लंड दुसरी कसोटी जिंकण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.
२०२१ नंतर आर्चर पहिल्यांदाच कसोटी संघात परतणार आहे. २०२१ नंतर आर्चर दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर होता. तथापि, आता तो तंदुरुस्त झाल्यानंतर संघात परतला आहे. २ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी आर्चरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्चरने इंग्लंडसाठी १३ कसोटी सामने खेळलेले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : लीड्स कसोटी सामन्यात टाळ्या वाजवणारी ‘ती’ कोण? ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर तूफान व्हायरल..
पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवडकर्त्यांकडून संघात फक्त एकच बदल करण्यात आला आहे. त्यांनी जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिले आहे. आयपीएल दरम्यान त्याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आर्चरने ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध करून दाखवली. त्यानंतरच त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ससेक्ससाठी आर्चरने १८ षटकांत ३२ धावा देऊन १ बळी टिपला आहे.
हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत जोश टोंगने शानदार कामगिरी केली आणि ७ बळी मिळवले. तो इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. कर्णधार बेन स्टोक्सने ५ बळी घेतले तर ब्रायडन कार्सने ४ बळी टिपले. ज्यामुळे संघाचे वेगवान गोलंदाजीचे पर्याय मजबूत दिसून येत आहेत. त्याच वेळी, आता या वेगवान गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचे नाव देखील सामील झाले आहे.
जर आर्चरला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले तर इंग्लंडला क्रिस वोक्सला डच्चू द्यावा लागणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे शोएब बशीरच्या जागी आर्चरला समाविष्ट करणे आणि स्पिन पर्याय म्हणून जो रूटच्या अर्धवेळ ऑफ स्पिनर म्हणून वापर करणेकरून ऑल-पेस आक्रमणाला मैदानात उतरवता येण्यास मदत मिळेल.
हेही वाचा : T20 Tri-series : दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवा कर्णधार! टी-२० तिरंगी मालिकेसाठी संघाची घोषणा..
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स