लीड्स कसोटी सामन्यात टाळ्या वाजवणारी 'मिस्ट्री गर्ल' (फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंडविरुद्ध भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्स येथे पहिली कसोटी खेळवण्यात आली आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने चौथ्या डावात इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात इंग्लंडच्या सलामीवीर बेन डकेटच्या १४९ धावांच्या जोरावर इंग्लंडने सहज ही लक्ष्य गाठले. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगला खेळ करून सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला. या दरम्यान, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक गूढ मुलगी दिसून आली. ही गूढ मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत, लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.
हेही वाचा : T20 Tri-series : दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवा कर्णधार! टी-२० तिरंगी मालिकेसाठी संघाची घोषणा..
लीड्स सामन्यादरम्यान, एक गूढ मुलगी टीम इंडियाच्या खेळाडूंचा जयजयकार करताना दिसून आली. ती काही वेळातच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. तथापि, या गूढ मुलीची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती टीम इंडियाच्या स्टाफशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कारण ती टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून चेअरिंग करताना दिसली होती.
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा टीम इंडियाचा डाव संपला तेव्हा ही मुलगी खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये दिसून आली. उपकर्णधार ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना, मिस्ट्री गर्ल चेअरिंग करताना दिसली होती.
हेही वाचा : Saudi T20 League : अरब देशांचा तहलका! आयपीएल-द हंड्रेडसारख्या स्पर्धांना धोका; ३४४२ कोटींची असणार मोठी लीग..
आता सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लची चर्चा होऊ लागली आहे. लोक या मुलीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तथापि, तिच्याबाबत कोणती माहिती अद्याप कळू शकलेली नाही. काही लोकांचे मत आहे की तिचे नाव राजल अरोरा आहे, जी टीम इंडियाशी संबंधित आहे. राजल भारतीय संघात सोशल मीडिया मॅनेजरची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे.