फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन : भारताला विश्वचषक जिंकवून देणारे विदेशी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन काही महिन्यांपूर्वीच वृत्त आले होते की, ते पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला कोचिंग देत होते. पाकिस्तानच्या वनडे आणि T२० क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी गॅरी कर्स्टन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. गॅरी कर्स्टन यांच्याशी पाकिस्तान क्रिकेट संघासोबत एप्रिल 2024 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डने करार केला होता. परंतु त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कर्स्टन यांच्या कार्यकाळात भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला होता. कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी, गॅरी कर्स्टन आणि पीसीबी यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
ESPNcricinfo यांनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने जेव्हापासून निवडीबाबत मुख्य प्रशिक्षकाचा हस्तक्षेप थांबवला आहे, तेव्हापासून मुख्य प्रशिक्षक आणि पीसीबी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. याबाबत गिलेस्पीने उघडपणे आपली निराशाही व्यक्त केली होती. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या घरच्या कसोटीदरम्यान गिलेस्पीने सांगितले होते की, मी आता फक्त मॅच डे विश्लेषक आहे आणि मी यासाठी करार केला नव्हता.
हेदेखील वाचा – इमर्जिंग आशिया कप 2024 चे जेतेपद अफगाणिस्तानच्या नावावर! रचला इतिहास
कर्स्टन यांनी याबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य दिलेले नाही, मात्र या सर्व गोष्टींमुळे त्या खूपच निराश झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या वनडे संघाची घोषणाही लांबणीवर पडली. पीसीबीच्या सध्याच्या निवड समितीमध्ये प्रशिक्षकांना बाजूला करण्यात आले आहे आणि कर्स्टन किंवा गिलेस्पी दोघांनाही हे आवडत नाही. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान हरला तेव्हा तीन महिन्यांत तिसरी निवड समिती स्थापन करण्यात आली. आकिब जावेद, अलीम दार, अझहर अली, असद शफीक आणि हसन चीमा हे त्याचे भाग होते. संघ निवडीतून प्रशिक्षक आणि कर्णधाराची मनमानी पूर्णपणे काढून टाकण्यात आली.
🚨 Gary Kirsten, who signed a two-year contract in April with the PCB, has stepped down barely six months into the role
Full story 👉 https://t.co/UQrMsel61K pic.twitter.com/ar9xDBLUDb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 28, 2024
गॅरी कर्स्टन यांनी आधी वक्तव्य देखील दिले होते, यामध्ये ते म्हणाले होते की, “पाकिस्तान संघात एकता नाही, ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत; सगळे वेगळे आहेत, डावीकडे आणि उजवीकडे. मी अनेक संघांसोबत काम केले आहे, पण मी अशी परिस्थिती पाहिली नाही”
नुकताच आता इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाने २-१ ने मालिका जिंकली होती. त्याचबरोबर आगामी काही महिन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. यावेळी त्यांचे एकदिवसीय आणि T२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण असणार हे पाहणं महत्वाचे ठरेल. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ झिम्बॉम्बेविरुद्ध देखील लढणार आहे. झिम्बॉम्बेविरुद्ध पाकिस्तानच्या दोन मालिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये T२० मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवल्या जाणार आहेत.