फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
इमर्जिंग आशिया कप 2024 विजेता संघ अफगाणिस्तान : २०२४ मध्ये झालेल्या विश्वचषकात अफगाणिस्तानच्या संघाने सर्वानाच चकित केले. कोणत्या क्रिकेट प्रेक्षकांना वाटले नव्हते की अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठेल. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या संघाने इमर्जिंग आशिया कप २०२४ मध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान अ ने रविवारी अल अमेरत क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाचा सात गडी राखून पराभव करून ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चे विजेतेपद जिंकले. रविवारी नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार नुवानिडू फर्नांडोने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे श्रीलंकेला फायनल जिंकता आली नाही. श्रीलंकेसाठी सहान अरचिगे (47 चेंडूत 64 धावा, 6 षटकार) हा एकमेव फलंदाज होता, जो क्रीजवर नाबाद राहिला आणि त्याने धावफलकावर काही महत्त्वाच्या धावा जोडल्या. अरचिगेच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे श्रीलंकेला पहिल्या डावात ७ बाद १३३ अशी मजल मारता आली.
हेदेखील वाचा – MS Dhoni : कॅप्टन कुलच्या पत्नीने मास्टर माइंड धोनीच्या ज्ञानांवर केले प्रश्न उपस्थित! व्हिडीओ व्हायरल
निमेश विमुक्ती याने 19 चेंडूत 23 धावा यामध्ये त्याने 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला आणि पवन रथनायके 21 चेंडूत 20 धावा केल्या. श्रीलंकेचे गोलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा दांडा गुल करण्यात अपयशी ठरले. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात वर्चस्व राखले आणि श्रीलंकेला 133/7 पर्यंत रोखण्यात यश मिळविले. बिलाल सामीने अफगाण गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 22 धावा देत तीन बळी घेतले. अल्लाह गझनफरनेही पहिल्या डावात दोन बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना, झुबैद अकबरी त्याची विकेट लवकर गमावली तो एकही धाव न करता बाद झाला. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल 55 चेंडूत 55 धावा यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. अफगाणिस्तानसाठी सलामी दिली, परंतु पाठलाग करताना त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.
ICYMI: #AfghanAbdalyan went past Sri Lanka A in the Grand Finale to Clinch their Maiden ACC Men’s Emerging Teams Asia Cup 🏆
🔗: https://t.co/JUFkFcLamW#AFGAvSLA | #MensT20EmergingTeamsAsiaCup | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/Z74u9lbBGn
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 27, 2024
श्रीलंकेच्या सहान अरचिगेने दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर अकबरीला बाद करून अफगाणिस्तानचा संघ संकटात टाकले. मात्र, अफगाणिस्तानसाठी अटल आणि दरवेश रसूलीने 20 चेंडूत 24 धावा, 2 चौकार आणि 1 षटकार मारून दमदार भागीदारी केली. करीम जनात २७ चेंडूत ३३ धावा करून ३ षटकार मारले आणि मोहम्मद इशाक ६ चेंडूत १६ धावा, १ चौकार आणि १ षटकार यांनीही चमकदार कामगिरी करत अफगाणिस्तानला अंतिम फेरीत विजय मिळवून दिला.
हेदेखील वाचा – टीम इंडियाचा कोच बदलणार? दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हा दिग्गज खेळाडू देणार भारतीय संघाला प्रशिक्षण
मोहम्मद इशाक आणि सेदिकुल्लाह अटल यांनी अंतिम फेरीत सात गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेच्या गोलंदाजी आक्रमणाची कामगिरी खराब झाली आणि दिलेले लक्ष्य मर्यादित करण्यात अपयश आले. श्रीलंकेकडून इशान मलिंगा, दुशान हेमंथा आणि सहान अरचिगे यांनीच विकेट्स घेतल्या.