Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 'हिटमॅन' निवृत्त होणार? गंभीर स्पष्टचं म्हणाला; "कर्णधार या पद्धतीने फलंदाजी..."
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. भारताने 2023 च्या फायनलचा वचपा काढत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यांतील सामन्यात प्रवेश केला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि भेदक गोलंदाजी यांच्या एकत्रित कामगिरीमुळे काल भारताने विजय प्रपात केला. कर्णधार रोहित शर्माची टीम ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हा रोहित शर्माचा अखेरचा सामना असणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता भारताचे कोच गौतम गंभीरने देखील भाष्य केले आहे.
येत्या रविवारी म्हणजेच तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना रोहित शर्माचा शेवटचा सामना असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचे वय आणि पुढील गोष्टी पाहून बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. 2027 चा विश्वचषक रोहित खेळणार का हे देखील पहावे लागणार आहे. यावर भारताचे कोच गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गौतम गंभीरला रोहित शर्माबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला, ‘आता सध्या आमच्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आहे. त्यामुळे याबाबत मी काय बोलणार. सांगायचे झाल्यास कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असल्यास ड्रेसिंग रूमसाठी तो एक मेसेज असतो. रोहितमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नसली तरी चांगली खेळी केली आहे. आम्ही त्याचनुसार खेळाडूचे मूल्यमापन करतो.’
कांगारूं’ना नमवत भारताची फायनलमध्ये शानदार धडक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.
IND Vs AUS Semi Final: अखेर 2023 चा वचपा काढलाच; ‘कांगारूं’ना नमवत भारताची फायनलमध्ये शानदार धडक
भारताने 265 धावांचे लक्ष्य हे 6 विकेट्स गमावत 48 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. के. एल. राहुलने विजयी षटकार मारत भारताच्या विज्यावर शिक्कामोर्तब केले. श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने केलेली भागीदारी या विजयात मोलाची ठरली. त्यानंतर विराटने अक्षर पटेल, के. एल. राहुलबरोबर केलेल्या लहान लहान पार्टनरशिप देखील महत्वाच्या ठरल्या. आजचा सामना जिंकून भारताने 2023 मधील फायनलचा वचपा देखील काढला आहे. स्टीव्हन स्मिथने 96 चेंडूमध्ये 73 धावा केल्या तर अॅलेक्स केरीने 57 चेंडूमध्ये 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला 264 धावापर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.