चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.
CT 2025. India Won by 4 Wicket(s) (Qualified) https://t.co/HYAJl7biEo #INDvAUS #ChampionsTrophy #SemiFinals
— BCCI (@BCCI) March 4, 2025
भारताने 265 धावांचे लक्ष्य हे 6 विकेट्स गमावत 48 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. के. एल. राहुलने विजयी षटकार मारत भारताच्या विज्यावर शिक्कामोर्तब केले. श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने केलेली भागीदारी या विजयात मोलाची ठरली. त्यानंतर विराटने अक्षर पटेल, के. एल. राहुलबरोबर केलेल्या लहान लहान पार्टनरशिप देखील महत्वाच्या ठरल्या. आजचा सामना जिंकून भारताने 2023 मधील फेणलचा वचपा देखील काढला आहे.
स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगली लय सापडली होती. त्याने सामन्यादरम्यान अनेक आकर्षक शॉट्स खेळले. आणखी थोडावेळ त्याने मैदानावर घालवला असता तर कांगारूंनी ३०० चा आकडा पार केला असता. मात्र ३७ व्या षटकात शमीचा एकच्या एका चेंडूवर तो बाद झाला. यावेळी भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा उत्साह पाहण्यासारखा होता.
Gautam Gambhir after Steve Smith Wicket 🤣#INDvsAUS pic.twitter.com/NGWdTRxkQx
— Vikas Yadav (@VikasYadav66200) March 4, 2025
स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले भारतीय खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ खूप आनंदी दिसत होते. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने गर्जना करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी तो काहीतरी बडबडतानाही दिसला. पण तो काय म्हणाला? याची पुष्टी होऊ शकली नाही.
मोहम्मद शमीचा प्रभावी मारा
स्टीव्हन स्मिथने 96 चेंडूमध्ये 73 धावा केल्या तर अॅलेक्स केरीने 57 चेंडूमध्ये 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला 264 धावापर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा