
GG vs UPW, WPL 2026 LIVE: GG's innings faltered! UP Warriors set a target of 154 runs; Sophie Devine shone.
GG vs UPW, WPL 2026 LIVE : आज गुरुवारी महिला प्रीमियर लीग २०२६ मधील १४ वा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्स संघ सोफी डिव्हाईनच्या अर्धशतकाच्या जोरावर ८ बाद १५३ धावाच उभ्या करू शकला. यूपीला हा सामना जिंकायचा असेल तर १५४ धावा कराव्या लागणार आहेत. युपी वॉरियर्सकडून क्रांति गौडने २ विकेट्स घेतल्या.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी(WPL 2026) युपी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला तर गुजरात जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. गुजरात संघाची सुरुवात खराब झाली. २३ धावांवर संघाची सलामीवीर डॅनी व्याट-हॉज १४ धावा करून बाद झाली. तिला क्रांति गौडने बाद केले. त्यानंतर आलेली अनुष्का शर्मा देखील १४ धावा करून झटपट बाद झाली, तिला देखील क्रांतीने माघारी पाठवले. तर कर्णधार ॲशले गार्डनरला काही खास करता आले नाही. ती ५ धावांवर माघारी गेली. ती दीप्ती शर्माची शिकार ठरली.
एका बाजूने विकेट्स जात होत्या, तर दूसऱ्या बाजूने सलामीवीर बेथ मुनी खेळत होती. गार्डनर नंतर मैदानात सोफी डिव्हाईन आली. दरम्यान बेथ मुनी ३४ चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. यामध्ये तिने ५ चौकार मारले. तिला सोफी एक्लेस्टोनमने बाद केले. कनिका आहुजा ६ धावा, भारती फुलमाळी ५ धावा, काश्वी गौतम ११ धावा तर रेणुका सिंग ठाकूर १ धावा करून बाद झाल्या, तर सोफी डिव्हाईनने शानदार अर्धशतक ठोकले आणि संघला १५० च्या पुढे पोहचवले. यामध्ये ती २ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने ५० धावा काढून तर तसेच हॅपी कुमारी ० धावा काढत नाबाद राहिली. युपी वॉरियर्सकडून क्रांति गौड आणि सोफी एक्लेस्टोन यांनीन प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर दीप्ती शर्मा आणि क्लो ट्रायॉनने प्रत्येकी १ विकेट घेतली. यूपीला विजयासाठी १५४ धावा कराव्या लागणार आहे.
Innings Break!@Giant_Cricket put on 1⃣5⃣3⃣ on the board on the back of Sophie Devine’s impactful half-century 🧡 Can #UPW chase it down? 🤔 Updates ▶️ https://t.co/Nlx8ASrDqO #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvUPW pic.twitter.com/BxSpuZPYc8 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 22, 2026
गुजरात जायंट्स महिला प्लेइंग इलेव्हन: बेथ मुनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, डॅनी व्याट-हॉज, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, हॅपी कुमारी
यूपी वॉरियर्झ महिला प्लेइंग इलेव्हन : मेग लॅनिंग (कर्णधार), किरण नवगिरे, फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, क्लो ट्रायॉन, श्वेता सेहरावत (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड
बातमी अडपेट होत आहे…