स्कॉटलंड संघ(फोटो-सोशल मि़डीया)
Bangladesh is out of the T20 World Cup : अखेर बांगलादेश क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषका २०२६ मधून बाहेर पडला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर, आता हे निश्चित झाले आहे की, बांगलादेश या मेगा स्पर्धेत सहभागी होणार नाही. बांगलादेश सरकारकडून हा निर्णय अलिकडेच जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे आता आयसीसीसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा : 37 वर्षीय विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य काय? छोले भटुरे खाऊन ‘किंग’ कसं गाजवतो मैदान? वाचा सविस्तर
आयसीसीच्या ठाम भूमिकेपासून या सर्व घटनेला सुरू झाली. जागतिक क्रिकेट संघटनेकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पष्टपणे सांगण्यात आले की, जर संघाला टी-२० विश्वचषकात खेळायचे असेल तर त्यांना त्यांचे सामने खेळण्यासाठी भारतात जावे लागणार. आयसीसीने बांगलादेशला या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी एक दिवस दिला होता, ज्याची अंतिम मुदत गुरुवारी संपणार होती. तथापि, बांगलादेशकडून नियोजित वेळेपूर्वी खेळण्यासाठी भारतात जाण्यास नकार देण्यात आला आणि त्यामुळे स्पर्धेतून त्यांची बाहेर पडण्याची खात्री झाली.
बांगलादेशने माघार घेतल्यामुळे २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याच्या जागी कोणता संघ असणार असा प्रश्न पडला होता. यासाठी आयसीसीने आधीच पर्यायी योजना तयार केलेली होती. आयसीसी रँकिंगनुसार, स्कॉटलंडची बांगलादेशचा बदली संघ म्हणून स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी निर्णय जवळजवळ निश्चित मानला जाऊ लागला आहे.
स्कॉटलंडला बांगलादेश सारख्याच ग्रुप सी मध्ये समाविष्ट करण्यात येणार. याचा अर्थ स्पर्धेच्या वेळापत्रकात काही एक बदल होणार नाही. स्कॉटलंड आता बांगलादेश जे सामने खेळणार होते त्याच वेळेत आणि त्याच तारखेला सामने खेळेल. या गटात आधीच वेस्ट इंडिज, इंग्लंड, इटली आणि नेपाळचे संघ आहेत.
हेही वाचा : Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर
टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळले जातील. बांगलादेशचा पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे त्याच दिवशी खेळला जाणार होता. हा सामना आता त्याच ठिकाणी होईल, परंतु बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे.






