गेल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने MI ने स्पर्धेत आपला वेग गमावला आहे. गुजरातने यूपीविरुद्ध सामना जिंकून स्पर्धेमध्ये दमदार कमबॅक केला आहे. गुणतालिकेचे आता कालच्या सामन्यानंतर कसे चित्र आहे…
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्स संघ सोफी डिव्हाईनच्या अर्धशतकाच्या जोरावर यूपी वॉरियर्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आज गुरुवारी महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर १४ व्या सामन्यात युपी वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
WPL 2026 च्या या स्पर्धेत युपी वॉरियर्सचा फॉर्ममध्ये नसलेल्या गुजरात जायंट्सविरुद्ध वरचढ ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरित दोन प्लेऑफ स्थानांसाठीची स्पर्धा अत्यंत रोमांचक बनली आहे.