
From gold medal to political arena! The youngest minister inducted into Bihar government! Shreyasi Singh takes oath as minister
Who is Shreyasi Singh? : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून २४३ पैकी २०२ जागा जिंकून एनडीएने राज्यात मोठा विजय मिळवला आहे. या विजयादरम्यान, नितीश यांच्या मंत्रिमंडळात एक नवीन नाव जोडले गेले आहे. ज्याने क्रीडा जगात भारताला जागतिक ओळख मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. श्रेयसी सिंह असे ते नाव आहे. सुवर्णपदक विजेती नेमबाज आणि आता आमदार असा सिंह यांचा शपथविधी सोहळ्यादरम्यान ती मंचावर आली तेव्हा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा : कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर
३४ वर्षीय श्रेयसी सिंह भारतीय नेमबाजीतील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असून तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यामध्ये तिने असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. २०२० मध्ये, तिने पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर बिहार विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून आली.
यावेळीही तिने जमुई विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकली आणि तीही गेल्या वेळेपेक्षा जास्त फरकाने जिंकून आली. तिची लोकप्रियता आणि तिच्या विजयाच्या प्रभावामुळे तिला नितीश सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रेयसी सिंह या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरली आहे.
श्रेयसी सिंगची क्रीडा कारकीर्द अपवादात्मक अशीच राहिली आहे. तिने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. त्यानंतर, तिने २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदकांची कमाई करून देशाची मानउंचावली होती. तिच्या कामगिरीची दखल घेत, भारत सरकारकडून तिला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा : अखेर संघाची घोषणा! Karun Nair चे चमत्कारिक पुनरागमन! ‘या’ खेळाडूंची प्लेइंग इलेव्हनमध्ये लागली वर्णी
श्रेयसी सिंग राजकारणात नवीन असली तरी तिचे कुटुंब बऱ्याच काळापासून या राजकारण क्षेत्राशी संबंधित राहिले आहे. तिचे वडील दिग्विजय सिंग यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये लोकसभा खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. २०१० मध्ये, बांका लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर तिच्या आईने देखील संसदेत प्रवेश केला.