फोटो सौजन्य : IndianPremierLeague
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स पहिल्या डावाचा अहवाल : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सध्या सामना सुरू आहे. मुंबईच्या संघाने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे आणि आज न्यू चंदिगडच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडला आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याच्या कमालीच्या खेळीने संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले. आजच्या सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत मुंबई इंडियन्स संघाने गुजरात टायटल समोर 229 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
रायन रिकल्टन त्याच्या जागेवर आज जॉनी बियरस्टो याला घेतले होते आणि त्याने येताच आज धुवाधार सुरुवात मुंबई इंडियन्स संघाला करून दिली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल आज सांगायचं झाले तर फलंदाजांनी आज येताच धावांचा पाऊस पाडला. जॉनी बेयरस्टो याला रायन रिकल्टन याच्या जागेवर घेण्यात आले होते. त्याने आज कमालीची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या संघाला करून दिली त्याने 22 चेंडूमध्ये 47 धावा केल्या आणि यामध्ये त्यांनी तीन षटकार हे मारले त्याचबरोबर चार चौकार ठोकले. सूर्यकुमार यादव आज स्वस्तात बाद झाला. त्याने 20 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या आणि विकेट गमावली. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला.
रोहित शर्माने आजच्या सामन्यात कमालीची खेळी खेळली त्याने 50 चेंडूमध्ये 81 धावा केल्या. यामध्ये त्याने चार षटकार आणि नऊ चौकार मारले त्याचबरोबर 162 ने स्टाईक रेट्ने त्याने फलंदाजी केली. तिलक वर्मा याने संघासाठी 11 जुलैमध्ये 25 धावा केले आम्हाला त्याने तीन षटकार ठोकले. नमन धीर सहा चेंडूंमध्ये नऊ धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नऊ चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन षटकार मारले.
Innings break!
A spectacular batting performance from @mipaltan as they post 228/5 in the #Eliminator🔥
Will @gujarat_titans chase this down? 🤔
We will find out 🔜
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/d8rFOmWjnq
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
मुंबई इंडियन्स संघाने मोठी धावसंख्या उभारल्यामुळे गुजरातच्या संघाला नक्कीच क्वालिफायर दोन साठी आव्हान उभे करेल आज गुजरातच्या संघाचे फलंदाजी कशी राहील यावर चहा त्यांचे लक्ष असणार आहे. साई सुदर्शन याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे आज त्याची खेळी संघासाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.