फोटो सौजन्य : Gujarat Titans
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स टाॅस अपडेट : आयपीएल 2025 चा आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आज जो संघ विजयी होईल तो संघ काल पराभूत झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध लढणार आहे आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना फारच महत्त्वाचा आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या संघाला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
आजच्या सामन्यामध्ये गुजरातच्या संघात जोस बटलर हा संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे गुजरात टायटनच्या संघाच्या फलंदाजी मध्ये आज कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांवर नक्कीच फलंदाजीचे ओझे असेल. हेच दोघे आज कशी कामगिरी करतील हे पाहणे मनोरंजक ठरेल. जोस बटलरच्या जागेवर आजच्या सामन्यात कुशल मेंडिसला रिप्लेसमेंट म्हणून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर अर्शद खानला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
मुंबई इंडियन्सचा संघाबद्दल सांगायचे झाले तर रायल रिकल्टन हा संघाबाहेर झाला आहे त्याच्या जागेवर जॉनी बेयरस्टो याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर राज अंगद बावा याला देखील आज प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे. त्याचबरोबर दीपक चाहर आज प्लेइंग इलेव्हन चा भाग नाही त्याच्या जागेवर आजच्या सामन्यात रिचर्ड ग्लीसन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to bat first against @gujarat_titans
Updates ▶️ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/E3G3NU0FXK
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), वाॅशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशीद खान, जेराल्ड कोएत्झी, साई किशोर, मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा.
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, राज अंगद बावा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, रिचर्ड ग्लीसन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.