Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

Guillermo Ochoa Retires From Professional Football During FIFA World Cup 2026: मेक्सिकोचा दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी फिफा विश्वचषक २०२६ मध्ये चेक रिपब्लिकविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळत ऐतिहासिक विक्रम रचला. या सामन्यानंतर त्यांनी प्रोफेशनल फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या गौरवशाली कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 02:41 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास
  • वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम
  • दिग्गजांच्या यादीत ग्विलर्मोचा समावेश
मेक्सिकोचा दिग्गज गोलकीपर गुइलेर्मो ओचोआ यांनी फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आपला शेवटचा सामना खेळून इतिहास रचला आहे. चेक रिपब्लिक विरुद्धच्या ‘अ’ गटातील सामन्यात ते ७७ व्या मिनिटाला मैदानात उतरला आणि विश्वचषकात मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. ओचोआने वयाच्या ४० वर्षे आणि ३४६ व्या दिवशी हा विक्रम केला. यासह, त्याने मेक्सिकोचे माजी कर्णधार राफा मार्केझ याचा विक्रम मोडला, ज्यांनी २०१८ च्या विश्वचषकात वयाच्या ३९ वर्षे आणि १३९ व्या दिवशी हा विक्रम केला होता. यासोबतच, त्याने प्रोफेशनल फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

Ind vs Ire1st T20: भारत-आयर्लंड पहिला टी-20 सामना आज; अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी, बेलफास्टची खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या

लुईस एंजल मालागोनच्या जागी गुलेर्मो ओचोआला संधी

ओचोआने यापूर्वीच २०२६ च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. चेक रिपब्लिकविरुद्धचा हा सामना मेक्सिकोसाठी त्याचा शेवटचा होता. मेक्सिकोचा मुख्य गोलकीपर, लुइस अँजेल मालागॉन, जखमी झाल्यामुळे त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ओचोआने आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ करत हा सामना अविस्मरणीय बनवला.

सहा विश्वचषकांमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या गटात ग्विलर्मोचा समावेश

चेक रिपब्लिकविरुद्धच्या सामन्यात खेळून ओचोआने सहा फिफा विश्वचषकांमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. आता तो या प्रतिष्ठित यादीत अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पंक्तीत सामील झाला आहे. ओचोआ २००६ आणि २०१० च्या विश्वचषकांमध्ये राखीव गोलकीपर म्हणून संघाचा भाग होता, तर २०१४, २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषकांमध्ये त्याचा मुख्य गोलकीपर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात मेक्सिकोने चेक रिपब्लिकचा ३-० ने पराभव केला.

मेक्सिकोच्या विजयानंतर ओचोआ भावूक

मेक्सिकोच्या ३-० विजयानंतर, ओचोआ चाहत्यांना म्हणाला, ‘सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, लोकांना तुमची मेहनत आणि प्रयत्न समजतात. मी नेहमी त्यांच्यासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा आणि एक छाप सोडण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते की आजचा निरोप समारंभ यापेक्षा चांगला असूच शकला नसता.’ हे मैदानही ओचोआसाठी खूप खास होते. त्याने शेवटचा सामना अझ्टेका स्टेडियमवर खेळला, हे तेच मैदान आहे जिथे त्याने २००४ मध्ये क्लब अमेरिकासाठी पदार्पण केले होते.

ओचोआ पुढे म्हणाला की, ‘ज्या स्टेडियममध्ये माझ्या फुटबॉल प्रवासाची सुरुवात झाली आणि जिथे मी मोठा झालो, तिथे मला लोकांचे प्रेम मिळाले. जेव्हा मी स्टँड्समध्ये बसायचो, तेव्हा मला वाटायचे की मला मैदानावर उतरून याच स्टेडियममध्ये खेळायचे आहे.’

मेक्सिकोने प्रथमच तिन्ही गट सामने जिंकले

ओचोआच्या शेवटच्या सामन्यात मेक्सिकोने चेक रिपब्लिकचा ३-० ने पराभव केला. दुसऱ्या हाफमध्ये मातेओ चावेझ, ज्युलियन क्विनोनेस आणि अल्वारो फिदाल्गो यांनी गोल केले. या विजयासह, मेक्सिकोने आपल्या इतिहासात प्रथमच विश्वचषक स्पर्धेतील तिन्ही गट सामने जिंकले. त्यांची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी १९८६ आणि २००२ मध्ये दोन विजय आणि एक ड्रॉ अशी होती.

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

Web Title: Guillermo ochoa retirement world cup 2026 last match record six world cups mexico vs czech republic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • mexico news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.