बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. हवामानही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, खेळपट्टीवर चांगला बाउन्स मिळू शकतो. आजच्या भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होणार आहे, परंतु दुपारी १ ते ४ च्या दरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल. हे धावांचा पाठलाग करण्यासाठी अनुकूल हे मैदान अनुकून मानले जाते.
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत ८ सामने झाले असून, भारताने सर्व सामने जिंकले आहेत. आयर्लंड अजूनही भारताविरुद्ध आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघाने आयर्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आजही भारतच विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. सोनी लाइव्ह ॲप आणि वेबसाइटद्वारे तुमच्या फोनवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा
आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए
Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज






