गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा आज 45 वा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. IPL 2024 मध्ये आज 28 एप्रिल रोजी रविवारी दुहेरी हेडर दिसणार आहेत. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून, हा मोसमातील 45 वा सामना असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोघांमधील हा सामना होणार आहे. या सामन्याद्वारे, बेंगळुरूला हंगामातील तिसरा आणि सलग दुसरा विजय नोंदवायचा आहे.
आज घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सच्या संघाला पाचवा विजय मिळवून टॉप-4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. गुजरातने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 4 जिंकले आणि 5 गमावले. गुणतालिकेत गुजरात सातव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीने आतापर्यंत 9 पैकी 2 जिंकले आहेत, त्यानंतर ते टेबलमध्ये तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत दोघांमधील संघर्ष खूपच रंजक ठरू शकतो.
दोन्ही संघाची आकडेवारी
आयपीएलमध्ये आतापर्यंत बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एकूण 3 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे, तर बेंगळुरूला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. अशा स्थितीत आज बेंगळुरूला हा विक्रम 2-2 असा बरोबरीत ठेवायचा आहे आणि गुजरातला आघाडी कायम ठेवायची आहे.
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान , रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संभाव्य प्लेइंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.