MS Dhoni 44th Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम केले आहेतच, जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीचा जन्म १९८१ मध्ये बिहारमधील रांची (आता झारखंडमध्ये) येथे झाला. आजही धोनी आपल्या रांची येथेच राहतो. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आता तो फक्त आयपीएल खेळतो. गेल्या हंगामात, ऋतुराज जखमी झाल्यानंतर त्याने पुन्हा सीएसकेचे नेतृत्व हाती घेतले.
एमएस धोनीचा जन्म एका राजपूत कुटुंबात झाला, त्याच्या वडिलांचे नाव पान सिंग आणि आईचे नाव देवकी देवी आहे. धोनी त्याच्या भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. धोनीने आपले शालेय शिक्षण डीएव्ही जवाहर विद्या मंदिर येथून केले, जिथे त्याने गोलकीपर म्हणून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तथापि, तो त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानंतर क्रिकेटमध्ये आला. २००१ ते २००३ पर्यंत धोनीने टीटीई (ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर) म्हणून काम केले.
त्याच्या लांब केसांमुळे, एमएस धोनीचा लूक इतर सर्व खेळाडूंपेक्षा वेगळा होता. त्याची आक्रमक खेळण्याची शैलीही लोकांना आवडली. सुरुवातीच्या काळातच त्याचे फॅन फॉलोइंग खूप वाढले. २००७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची क्रेझ दिसून आली. यानंतर, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी, धोनी भारताचा स्टार बनला.
महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकिर्दीत असे अनेक अविस्मरणीय क्षण दिले, जे क्रिकेटप्रेमींच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. नेतृत्वगुणांमुळे ओळखला जाणारा धोनी हा फक्त एक यशस्वी कर्णधार नव्हता, तर मैदानावरील संकटमोचक म्हणूनही तो कायम पुढे राहिला.त्याच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने टी-२० विश्वचषक (2007), वनडे विश्वचषक (2011), चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) यांसह जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकल्या. पण एका खेळाडू म्हणून, त्याने अनेक वेळा दबावाखाली खेळत भारताला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयाच्या दिशेने नेले. त्याची शांतपणे खेळ्याची शैली, निर्णायक निर्णय आणि न खचणारी वृत्ती हीच त्याच्या कारकिर्दीची खरी ओळख ठरली.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (2008)
पद्मश्री पुरस्कार (२००९)
आयसीसी पीपल्स चॉइस अवॉर्ड (२०१३)
पद्मभूषण (२०१८)
आयसीसी पुरुषांचा दशकातील एकदिवसीय संघ (कर्णधार आणि यष्टीरक्षक)- २०११-२०२०
आयसीसी पुरुषांचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघ (कर्णधार आणि यष्टीरक्षक)- २०११-२०२०
आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड – २०११-२०२०
आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम
धोनी हा क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तिन्ही प्रमुख आयसीसी ट्रॉफीज –
धोनीच्या वीजेसारख्या स्टंपिंगसाठी तो ओळखला जातो. त्याने एकूण १९२ वेळा स्टंपिंग करून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे:
हाडं ठिसूळ झाल्याने कधीही शरीराचा होईल सांगाडा, Bone Cancer ची 6 लक्षणं दिसताच गाठा हॉस्पिटल
धोनीने भारतासाठी एकूण ३३२ आंतरराष्ट्रीय सामने कर्णधार म्हणून खेळले, यामध्ये –
धोनीने २००५ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना नाबाद १८३ धावा ठोकल्या होत्या.
त्यावेळी त्याने केवळ १४५ चेंडूत १५ चौकार आणि १० षटकारांसह ही धमाकेदार खेळी केली.
यापूर्वी हा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर (१७२ धावा) होता, जो धोनीने मोडला.
धोनी हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर खेळत शतक करणारा एकमेव कर्णधार आहे.
२०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने केवळ १२५ चेंडूत ११३ धावा केल्या आणि भारताला संकटातून सावरले.