फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहलीचा वाढदिवस : भारताच्या संघाने झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताच्या संघाच्या फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः भारताच्या संघाचे अनुभवी फलंदाजी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु विराट कोहलीचे नाव हे दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये सामील केले जाते. त्याचे चाहते फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये पसरलेले आहेत. त्याच्या नावावर त्याने अनेक रेकॉर्ड त्याने केले आहेत. त्याचबरोबर महान खेळाडूंचे रेकॉर्ड देखील त्याने मोडले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहलीला क्रिकेट जगताचा राजा म्हटले जाते. कोहलीने जगाच्या कानाकोपऱ्यात आपली क्षमता सिद्ध केली आहे. काही माजी क्रिकेटपटू आणि तज्ञ देखील कोहलीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज मानतात. किंग कोहली आज 05 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर, या खास प्रसंगी विराट कोहलीला त्याची खरी ओळख कोठून मिळाली आणि तो इतका महान कसा झाला हे जाणून घेऊया.
हेदेखील वाचा – सचिन तेंडुलकरच्या 5 कोटींचे झाले 72 कोटी! ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. तो दिल्लीतील उत्तम नगरमध्ये लहानाचा मोठा झाला. कोहलीने वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी क्रिकेट स्वीकारल्याचे सांगितले जाते. यानंतर त्याने लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटचे बारकावे शिकून घेतले.
कोहलीने हळूहळू क्रिकेटमध्ये चमत्कार करायला सुरुवात केली. वयोगटातील क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटकडे वाटचाल केली. 2006 मध्ये कोहलीने दिल्लीकडून कारकिर्दीतील पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. याच दरम्यान कोहलीचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतरही कोहली कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीला गेला आणि त्याने 90 धावांची खेळीही खेळली. इथून कोहलीला थोडीफार ओळख मिळाली.
2008 अंडर-19 विश्वचषक विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाचा होता. या अंडर-19 वर्ल्डकपमधून कोहलीला खूप प्रसिद्धी मिळाली, असं म्हटलं जातं. त्यामुळे कोहलीचा टीम इंडियात येण्याचा मार्ग मोकळा झाला. कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता.
अंडर-19 विश्वचषकात छाप पाडणाऱ्या कोहलीला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजेच 2008 मध्ये त्याने टीम इंडियात प्रवेश केला. कोहलीने 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही आणि तो एकापाठोपाठ एक विक्रम करत राहिला.
कोहलीने 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. कोहलीने एकदिवसीय विश्वचषकात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले होते, तर सचिनच्या नावावर वनडेमध्ये 49 शतके आहेत. त्याचप्रमाणे कोहलीने कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच विक्रम मोडायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्याकडे एक महान फलंदाज म्हणून पाहिले जाऊ लागले.