
Hardik Pandya Romantic Mood: Hardik Pandya's new look for a romantic photo! He kissed Mahika Sharma on the lap
एका व्हिडिओमध्ये, हार्दिक आणि महिका पारंपारिक पोशाखात कॅमेऱ्यासमोर पोज देऊ न उभे आहेत. तर व्हिडिओ दरम्यान, हार्दिक त्याच्या प्रेयसीच्या गालावर किस करताना दिसून येत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, हे जोडपे पूजा करताना असून ते त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचा भाग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एक फोटो देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हार्दिक पंड्या महिकाला मांडीवर घेऊन जाताना दिसून येत आहे. तसेच महिका आरशात सेल्फी काढत आहे. या फोटोमध्ये या जोडप्याचे गोंडस आणि रोमँटिक बंध उघड होताना दिसत आहे. जे चाहत्यांना खूप आवडले आणि त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्दिक आणि महिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महिका शर्मा ही व्यवसायाने मॉडेल असू ती अभिनेत्री देखील आहे. तिने अर्थशास्त्र आणि वित्त या विषयात पदवी संपादन केले आहे. त्यानंतर तिने पूर्णवेळ मॉडेलिंग आणि अभिनय केला. ती तनिष्क, विवो आणि युनिक्लो सारख्या प्रमुख ब्रँडच्या जाहिरात मोहिमांमध्ये देखील दिसून आली आहे. महिकाने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे आणि तरुण ताहिलियानी सारख्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक देखील करताना दिसून आली होती. २०२४ मध्ये, तिला इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये न्यू एज मॉडेल ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते.